राष्ट्रीय बालिका दिवस कार्यक्रम
स्त्रियांनी स्वतः मधली स्त्रीशक्ती ओळखली पाहिजे—सौ. शिवकन्या पटवे
नांदेड प्रतिनिधी वैभव घाटे
स्त्रीयांनी आपल्या जीवनात स्वतःला कमी न लेखता आपल्यातील स्त्री शक्तीला ओळखले पाहिजे असे प्रतिपादन कुंडलवाडी संकुलातील जि.प. प्राथमिक शाळा डौर येथील तंत्रस्नेही शिक्षिका सौ. शिवकन्या पटवे यांनी केले .ते कुंडलवाडी संकुलातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली येथे सुभाष चंद्र बोस यांची जयंती व हळदीकुंकू मिलन कार्यक्रमात कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील जेष्ठ नागरिक सौ.सिद्धेश्वरी मल्लिकार्जुन स्वामी या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक तथा सहशिक्षक ना. सा. येवतीकर सौ. अर्चना येवतीकर सह आदी मान्यवर उपस्थित होते .पुढे बोलताना पटवे मॅडम म्हणाल्या की, संसाराच्या रथाचे दोन चक्र नसून ते सायकलचे दोन चाक आहेत.सायकलचे मागचे चाक अति महत्त्वाचे म्हणजे ती स्त्री होय. स्त्री स्वतःला कमी लेखते. ती स्वतःला अबला समजते. पण तिने स्वतःमधील स्त्रीशक्तीला ओळखले पाहिजे. स्त्री ही संस्कार दात्री, मातृत्व ,नम्रता अशा अनेक गुणांनी नटलेली आहे. बेटी बचाव या विषयाला अनुसरून स्त्रीच मुलाला वंशाचा दिवा समजते.तर स्त्री आपल्या मुलीला नैराश्य युक्त, भीतीयुक्त जीवन बनवत असते .मुलीं सोबतआई जर मैत्रीपूर्ण व्यवहार केली तर मुली सुद्धा आपल्या जीवनात नेत्रदीपक कार्य करू शकतात. तसेच आपल्या मुलांना संस्कार देण्याचे काम हे फक्त स्त्रीच करू शकतात .शिक्षण हे घेतल्या जाते पण संस्कार उचलल्या जातात म्हणून स्त्री आपल्या मुलांना योग्य वयात योग्य ते संस्कार दिले पाहिजे असे आव्हानही त्या याप्रसंगी केल्या. या प्रसंगी ना.सा.येवतीकर,सौ.कल्पना सुरकुटलावार,सौ.भाग्यश्री गोसके,सौ.विद्या तुंगेनवार,आय.एच.झंपलकर यांचेही समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास कुंडलवाडी संकुलातील मु.अ. सौ बंडे मॅडम, सहशिक्षिका सौ.कल्पना सूरकुटलावार, सौ. भाग्यश्री गोस्के, सौ. रेणुका माडपलू,सौ. शिवानी पाटील, सौ.विद्या तुंगेनवार सौ. प्रीती झंपलकर यांच्यासह चिरली येथील अंगणवाडी शिक्षिका सौ .अर्चना चव्हाण व आशाताई यांच्यासह गावातील सर्व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सुत्रसंचालन या शाळेतील सहशिक्षिका सौ. निता दमकोंडवार (दरबस्तेवार) यांनी केले तर उपस्थितांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक आय.एच.झंपलकर यांनी मानले.






