चाळीसगाव रेल्वे स्थानकावर नवीन गाड्यांना थांबा मिळावा – रयत सेनेची मागणी
नागपुर पंढरपुर रेल्वे सुरू व्हावी
खासदार उन्मेष पाटील यांना दिले मागणीचे निवेदन
मनोज भोसले
चाळीसगाव – चाळीसगाव रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट व नविन गाड्यांना थांबा मिळावा तसेच भाविकांना पंढरपूर जाण्यासाठी सोय व्हावी म्हणुन नागपुर पंढरपूर रेल्वे सुरू होऊन चाळीसगाव रेल्वे स्टेशन ला त्या गाडीचा थांबा मिळावा अशी मागणी रयत सेनेच्या वतीने खासदार उन्मेष पाटील यांना दि 20 रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली असून रेल्वे प्रशासनाने मागणी मान्य न केल्यास रयत सेनेच्या वतीने चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की चाळीसगाव रेल्वे स्थानक हे धुळे, जळगाव, औरंगाबाद ,नाशिक या चार जिल्ह्याच्या सीमेवर असुन अनेक पर्यटक व भाविक दर्शनासाठी औरंगाबाद ,चाळीसगाव या ठिकाणी येत असतात चाळीसगाव रेल्वे स्टेशन मध्यवर्ती रेल्वे स्थानक असल्याने येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता पाहिजे तेवढ्या रेल्वे गाडयांना थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते चाळीसगाव तालुका शहर व चाळीसगाव तालुक्यातील तिन्ही बाजूला असलेल्या जिल्ह्यातील बरेच प्रवासी त्यात विद्यार्थी, व्यापारी ,नोकरदार वर्ग हे रेल्वेने प्रवास करत असतात मात्र चाळीसगाव रेल्वे स्थानकावर वेळेवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नाही शिवाय फार मोठ्या फरकाने रेल्वे गाड्यांना थांबा आहे.
मध्यंतरी च्या वेळेत सुपरफास्ट जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा व रेल्वे प्रवाशांचे हाल टाळावेत म्हणून वाराणसी मुंबई रत्नागिरी एक्सप्रेस अप गाडी नंबर 12166 दुपारी 12 वाजता तर डाऊन गाडी नंबर 12165 व दाणापूर पुणे एक्सप्रेस गाडी नंबर 12150 रात्री 9 वाजता तर डाऊन 12149 तर हावडा पुणे आजाद हिंद एक्सप्रेस गाडी नंबर 12130 रात्री 11 वाजता डाऊन गाडी नंबर 12129 या सुपरफास्ट गाड्याना चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा तसेच मुंबई भुसावळ पॅसेंजर ला अतिरिक्त बोगी जोडावेत. तसेच महाराष्ट्र एक्सप्रेस ला नागपूर सोलापूर कोच जोडण्यात येत होता तोच सद्यस्थितीत बंद करण्यात आला असून तो पुन्हा पूर्ववत सुरू करावा. मुंबई मनमाड राज्यराणी एक्सप्रेस चा थांबा मनमाड पर्यंत असून तो भुसावळ रेल्वे स्थानका पर्यंत वाढवण्यात यावा .तसेच चाळीसगाव रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्र 3 व 4 वरील प्रवासी शेड लहान असुन ते मोठे करण्यात याव्यात अशी मागणी केली असून
नागपुर पंढरपुर रेल्वे सुरू व्हावी
नागपूर अकोला व्हाया मिरज मार्गे पंढरपूर रेल्वे दोन दिवस सुरु असून तीच गाडी हप्त्यातुन तीन दिवस भुसावळ मार्गे जळगाव चाळीसगाव मनमाड मार्गे दौंड पंढरपूर सुरू व्हावी कारण आषाढी एकादशीनिमित्त वारीसाठी अमरावती पंढरपूर गाडी सुरू केल्याने लाखो वारकऱ्यांना विठ्ठल रुक्मिणी दर्शन घडले होते त्याचप्रमाणे खानदेशातील वारकऱ्यांना या गाडीचा मोठा फायदा होईल व विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनासाठी प्रवास सुखकर होईल म्हणून नागपूर (पंढरपूर) कोल्हापूर एक्सप्रेस गाडीचे तीन दिवस नागपूर व्हाया अकोला भुसावळ मनमाड दौंड पंढरपूर सुरू व्हावी यासाठी आपण रेल्वे मंत्र्यांना भेटुन पाठपुरावा करून विशेष प्रयत्न करावेत. तसेच आज पासून पासुन तीन महिने प्रायोगिक तत्वावर गाडी क्र 02111 ही रविवारी सकाळी 9 वाजता सोलापूर कुर्डुवाडी, दौड, नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा, नागपूर सोमवारी दु 13,30 पोहचते तसेच 02112 ही गाडी सोमवारी दु 15 ,00 वा नागपूरहून निघते व मंगळवारी सकाळी 8,40 ला सोलापूरला पोहचते याचप्रमाणे गाडी क्र 02113 व सोलापूरहून गुरुवारी दु 13,00 निघते व नागपूरला शुक्रवारी सकाळी 5,15 ला पोहचते तसेच 02114 नागपूरहुन शुक्रवारी संध्याकाळी 19,40 ला निघते व सोलापूरला दु 13,10 वा पोहचते या दोन्हीही गाड्याना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्यास पंढरपूर जाण्यासाठी व येण्यासाठी वारकऱ्यांना सोयीच्या होतील पण त्याना जळगाव पाचोरा चाळीसगाव थांबा नाही थांबा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत या मागण्या मान्य न झाल्यास रयत सेनेच्या वतीने चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी चाळीसगाव रेल्वे स्थानकावर नविन रेल्वे गाड्यांना थांबा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले ,निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, जिल्हाध्यक्ष संजय कापसे ,तालुका उपाध्यक्ष भरत नवले ,मुकुंद पवार,विलास मराठे , उपाध्यक्ष प्रदीप मराठे, छोटू आहिरे ,हर्षवर्धन इंगोले, अनिल शिंदे, नितीन पाटील, पवन नागणे स्वप्नील जाधव बाला देशमुख,सुनिल पवार,रमेश पवार,दिलीप पवार,व सामाजिक कार्यकर्ते चेतन वाघ, संजय चौधरी अदिच्या सह्या आहेत






