डोणदिगर ( ता.चाळीसगाव, जि. जळगाव) येथील जि. प. प्राथमिक शाळेत हिरव्यागार झाडांची दिवसाढवळ्या कत्तल ;
मुख्याध्यापकाची बघ्याची भूमिका ; वन विभाग झोपलेले???
यातील सहभागी व दोषीवर गुन्हे दाखल व्हावेत ?
शासन एकीकडे ‘ 1 च लक्ष , 65 लक्ष वृक्ष ‘ “झाडे लावा झाडे जगवा” ” वृक्षवल्ली आम्हा सोयरी ” अशा घोषणा देत असताना मात्र दुसरीकडे डोणदिगर येथील जि.प . प्राथमिक शाळा आवारातील 2 निलगिरी, 1 गुलमोहर व 1 निंब अशा झाडांची कत्तल करण्यात आली . या निंदनीय घटनेत शाळेच्या मालकीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असतानाही मात्र येथील मुख्याध्यापक व शिक्षण समिती अध्यक्ष मात्र मूग गिळून बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. की हेच स्वता: ला विद्येचे आराध्य दैवत म्हणवणारे यात सहभागी असून वाटेकरी आहेत ??? असे एक ना अनेक सवाल तेथील वृक्षप्रेमी कडून केला जात आहे. मागील वर्षी वृक्षलागवडीचे चांगलंच पेव फुटलं होत , अधिकार्यांपासून ते सामाजिक संघटना ,आमदार, खासदार ,नेते , पुढारी ,पत्रकार, पोलीस प्रशासन इत्यादींनी वृक्ष लागवड करताना वैयक्तिक तसेच सामूहिक फोटो काढणे व ते सोशल मीडियावर टाकणे याचा चांगलाच धडाका धरला होता व हा एक स्तुत्य व शाश्वत विकासाचा उपक्रम असल्याने समाजाने देखील याला दुजोरा व प्रतिसाद दिला. तात्पर्य : म्हणजे वृक्ष हा मानवी जीवनासाठी , भुतलावासाठी तसेच नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी किती अनमोल व महत्वपूर्ण आहे??? याची जणूकाही सर्वांनाच जाणीव झाली होती .

पेशंट दवाखान्यात गेल्यानंतर त्याला जेव्हा उपचारादरम्यान ऑक्सीजनची गरज भासते व तो ऑक्सीजन सिलेंडर साठी पैसे मोजतो व ते पैसे देऊन विकत घेतो .मात्र त्यावेळी त्याला रोजच जीवन जगताना झाडापासून मिळणाऱ्या फुकट ऑक्सीजन चे महत्व कळते .झाडांची मुळे ही माती धरून ठेवतात त्यामुळे मातीची झीज होत नाही अथवा पावसाळ्यात माती वाहून जात नाही .रणरणत्या उन्हात आपण आपल्या मोटरसायकली झालाखाली लावतो . प्रवासादरम्यान लाखो रुपये किमतीची आपली चार चाकी गाडी पार्क करण्यासाठी आपण डेरेदार व घनदाट सावली असलेल्या वृक्षाचा शोध घेतो . त्या सावलीत गाडी लावून आपण तिचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करतो. अशी सर्व काही झाडांची अगाध महिमा असताना येथील शाळा आवारातील हिरवेगार व डेरेदार वृक्ष काही विघ्नसंतोषीनी वन विभागाची अथवा सन्माननीय तहसीलदार / प्राताधिकारी यांची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता कत्तल केली असल्याचे समजते. ही शाळा आवारातील वृक्षतोड करून यांनी गावाचा नेमका कोणता व काय विकास साधला हा मात्र संशोधनाचा विषय आहे .या विद्यामंदिरातील व पूर्णतः शासकीय मालकीच्या झाडांची कुणाच्या आदेशाने व कुणी तोडली ??? याचा शोध घेणे अगत्याचे आहे. या कांड मध्ये सामील शिक्षण विभागातील व काही राजकीय मंडळींवर कायद्यानुसार कार्यवाही व्हावी अशी सनदशीर मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे. यात वृक्ष कत्तलीत सहभागी दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत जेणेकरून असे समाजविघातक कृत्य करण्यास भविष्यात कुणी धजावणार नाही???






