Marwad

अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करणाऱ्या महसूल पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरुध्द मारवड पो स्टे ला गुन्हा दाखल

अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करणाऱ्या महसूल पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरुध्द मारवड पो स्टे ला गुन्हा दाखल

मारवड

अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करणाऱ्या महसूल पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाविरुध्द मारवड पो स्टे ला गुरनं १/२०२० भादंवि क.३५३,३७९,२७९,१८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन तपास सपोनि राहुल फुला पोहवा १८११ किशोर पाटील पोना १४० सुनिल अगोणे व चापोना ९७७ दिनेश कुलकर्णी हे करीत आहेत.

ही घटना खर्दे- वासरे रस्त्यावर बुधवारी दि.८ चे मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली.
मा.तहसीलदारांच्या वाहनाचे रु.१२-१५ हजाराचे नुकसान झाले आहे.
सदर महसुल पथकात मंडळ अधिकारी भानुदास शिंदे, तलाठी स्वप्निल कुलकर्णी, तलाठी गौरव शिरसाठ, तलाठी केशव चौधरी, शासकीय वाहनचालक बाळकृष्ण जाधव हे होते.
याप्रकरणी ट्रॅक्टर (एमएच 19 – 807) वरील चालक भिमराव कैलास वानखेडे (रा. चौबारी, ता. अमळनेर) यावर मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूने भरलेले वाहन मारवड पोलिसांच्या ताब्यात आहे.

प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी तापी, बोरी व पांझरा काठावरील वाळूच्या ठिकाणांवर जमाव बंदीचे आदेश देऊन अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावला आहे. तहसीलदार मिलिंद वाघ यांनीही विविध भागात पथकाची नेमणूक करून कडक गस्त ठेवली आहे. पोलीस सुध्दा गस्ती दरम्यान चोरट्यांवर लक्ष ठेवुन सापडताच गुन्हे दाखल करत आहेत.
मात्र, छुप्या पद्धतीने अवैध वाळू वाहतूक सुरू असून, प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button