Dhule

? Crime Diary..हिंगोली बलात्कार प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी दया…

हिंगोली बलात्कार प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी दया…

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे म्हणून कठोर कायदयाची तात्काळ अंमलबजावणी करा… आमदार फारूक शाह

धुळे शहरातील वाहतूक समस्या व धुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था याबाबतही झाली दीर्घकाळ चर्चा…

असद खाटीक

(धुळे दि.३०-०९-२०२०) हिंगोली शहरात दि. ३१ ऑगस्ट २०२० रोजी बलात्काराची घटना घडली. शहरातील मस्तान शाह नगर या भागात ७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तंबाखू आणण्याच्या बहाण्याने घरामध्ये बोलवुन तिचे लैंगिक शोषण करून तिच्यावर बलात्कार केला. आलीम खान ताज खान पठाण, रा. मस्तान शाह नगर, हिंगोली असं या नराधमाचं नाव आहे. त्याच्या विरोधात बलात्कार आणि बाललैंगिक अधिनियमानुसार हिंगोली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असतांना देखील आजतागायत आरोपीस अटक झालेली नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीला अटक झालेली नाही. घडलेली घटना अतिशय गंभीर असल्याकारणाने आरोपीला तात्काळ अटक करून सदर खटला जलद न्यायालयात चालवुन नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी.
महाराष्ट्र राज्य गुन्हेगारीत सातव्या क्रमांकावर जाऊन पोहचले असून, होणाऱ्या गुन्हांमध्ये १९ टक्यांनी वाढ झाली आहे तर सर्वाधिक गुन्हे मुंबईत घडले आहेत. स्त्रियांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात गुन्हेगारांना कायद्याचा कुठल्याच प्रकारचा धाक राहिला नाही याच कारणाने राज्यात गुन्हेगारी फोफावत आहे. राज्यात दरोडे, खुन, चेनस्नँचिंग, चोरी, बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक आणि वचक बसण्यासाठी तात्काळ कठोर कायदयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी आमदार फारूक शाह यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेऊन केली. यावेळी धुळे शहरातील वाहतूक समस्या आणि धुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था याबाबतही झाली दीर्घकाळ चर्चा करण्यात आली.

कृपया प्रसिद्धीसाठी दि. ३०-०९-२०२०

आपला

निलेश काटे
जनसंपर्क अधिकारी तथा स्वीय सहाय्यक
आमदार, धुळे शहर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button