अमळनेर प्रतिनिधी नूरखान
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमळनेर सह जिल्ह्यातील बाजार समित्या बंद
कोरोना चा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी अमळनेरसह जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये सोशल डीस्टंसिंग पाळले जात नाही. म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सर्व बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश गुरुवारी पारित केले.
करोना विषाणू (कोव्हिड १९) चा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यात उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होणारे धान्य खरेदी-विक्री तथा तत्सम व्यवहारांसाठी एकाच वेळेस दहा पेक्षा अधिक नसतील
एवढ्याच लोकांना प्रवेश देण्याबाबत अथवा टप्प्या टप्प्याने संबंधित व्यवहार सुरु ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. परंतु आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून जिल्ह्यातील
जळगाव शहर, अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार पुढील आदेश होईपावेतो पूर्णपणे बंद ठेवण्याबाबत आदेशीत केले
आहे”. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, १८९७ (४५) चे कलम १८८ नुसार कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.






