संपादकीय

5 सप्टेंबर बोगस शिक्षक दिन….. विद्ये विना मती गेली..हे १८ व्या शतकात सांगणाऱ्या महात्मा फुले यांचा स्मृतिदिनच खरा शिक्षक दिन

5 सप्टेंबर बोगस शिक्षक दिन…..
विद्ये विना मती गेली..हे १८ व्या शतकात सांगणाऱ्या महात्मा फुले यांचा स्मृतिदिनच खरा शिक्षक दिन

5 सप्टेंबर बोगस शिक्षक दिन..... विद्ये विना मती गेली..हे १८ व्या शतकात सांगणाऱ्या महात्मा फुले यांचा स्मृतिदिनच खरा शिक्षक दिन

शिक्षक दिन महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिवस २८ नोव्हेंबर….
प्रा जयश्री साळुंके दाभाडे
५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिना दिवशी मानणे योग्य आहे कारण 17 व्या 18 व्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजातील बहुजन वर्गाला शिक्षणाची वाट दाखविली.स्वतः दगड गोटे चिखलाचा मारा खाऊन अशिक्षित बहुजन समाजाला शिक्षण रुपी वटवृक्षाच्या छायेत आणलं.शिक्षणामुळेच आपण ब्रिटिश आणि स्वकीय शत्रूंच्या विरोधात लढू शकतो.विद्या नसेल तर माणसाचा जन्म व्यर्थ आहे. अश्या शिकवणी देऊन ज्या दाम्पत्याने शिक्षणाचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले त्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले अश्या महात्मा फुले यांचा स्मृतिदिनच शिक्षक दिन म्हणून आपण मनविला पाहिजे.या सर्व पार्श्वभूमीवर डॉ सर्व पल्ली राधाकृष्णन यांचे कार्य पाहता   त्यांचा जन्म दिन शिक्षक दिन म्हणून साजरा करणे योग्य ठरत नाही. भारताचे राष्ट्रपती असणे ही निश्चितच गौरवपूर्ण गोष्ट  आहे. त्यामुळे राष्ट्रपती ही व्यक्ती सन्माननीयच मानायला असते. पण कोण्या मोठ्या व्यक्तीने आपला जन्मदिवस अमुक-तमुक दिन म्हणून पाळा असे म्हटले आणि तो दिवस साऱ्या भारतभर जोरशोरात तशा प्रकारे साजरा झाला असे या दिवसाशिवाय दुसरे उदाहरण पहावयास मिळत नाही. पण राधाकृष्णन यांनी “माझा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा” असे म्हटले. आणि हा दिवस शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा होणे सुरूही झाले! हा साधा प्रकार नसून त्यामागे निश्चितच मोठी अंत:स्थ योजना व षडयंत्र, नियोजन बद्ध रचना होती  हे निश्चित.
डॉ. राधाकृष्णन यांना शिक्षणतज्ञ म्हटले जाते. पण त्यांनी शिक्षणावर लिहिलेले कोणतेही पुस्तक सापडत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांनी शिक्षणावर एकही पुस्तक लिहिले नाही, असे दिसते. त्यामुळे बी.एड. च्या अभ्यासक्रमात त्यांच्यावरील पाठात त्यांच्या शिक्षणावरील कोणत्याही पुस्तकांचा संदर्भ दिला जात नाही. अमक्या ठिकाणी ते काय म्हणाले, तमक्या ठिकाणी ते काय बोलले अशी मोघम उदाहरणे देऊन पाठ पूर्ण केलेला असतो. परंतु त्यावरून त्यांचे कोणतेही विशेष व नावीन्यपूर्ण शैक्षणिक तत्वज्ञान जाहीर  होत नाही. डॉ. राधाकृष्णन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १९८९ मध्ये अहमदाबादच्या एल.डी. इन्स्टिट्यूट ऑफ इंडोलाजी तर्फे एक विशेषांक काढण्यात आला होता. त्यात त्यांच्या धार्मिक तत्वज्ञानावर वारेमाप लेखन केले आहे; परंतु त्यांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाच्या योगदानावर काहीही दिलेले नाही. यावरूनही त्यांचे शैक्षणिक तत्वज्ञान काही विशेष नव्हते असे दिसून येते. वास्तविकत: त्यांनी लिहिलेली जवळजवळ सर्वच पुस्तके हिंदू तत्वज्ञानावर आहेत. नाही म्हणायला “एज्युकेशन, पोलिटिक्स अंड वॉर” हे त्यांचे एकमेव पुस्तक शिक्षणाच्या नावाचे असले तरी त्यात शालेय शिक्षणावर तसे काही नाही.
डॉ. राधाकृष्णन हे कोणत्या शाळेत शिक्षक होते? या प्रश्नाचे उत्तर अनेक वर्षांपासून कोणीही मला दिलेले नाही. शिक्षक हा शब्द प्रामुख्याने शाळेत अध्यापन करणाऱ्याना योजण्यात येतो.साधारण माहितीप्रमाणे ते अशा कोणत्याही शाळेत शिक्षक नव्हते. ते प्राध्यापक होते, पण प्राध्यापक म्हणजे शालेय शिक्षक नव्हे. प्राध्यापकांना शिक्षक म्हटलेले आवडत नाही.
ते पहिल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष होते असे सांगून त्यांच्या शिक्षक दिनाचे समर्थन करण्यात येते. परंतु तो आयोग उच्च शिक्षणाविषयी होता; शालेय शिक्षणावर नव्हता. त्याशिवाय इतर अनेक आयोग शालेय शिक्षणावर नेमण्यात आले होते व त्या इतर आयोगांनी राधाकृष्णन यांच्यापेक्षा चांगली भरीव कामगिरीही केली होती.
इंग्रज असताना आणि ते गेल्यावर येथील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सत्ता येथील जातीच्या उतरंडीवरील वरच्या स्तरावर असलेल्या लोकांकडे होती. त्यांचा राष्ट्रवाद हा अभिजन राष्ट्रवाद म्हणता येईल. त्या वरच्या स्तरावरील गब्बर लोकांचे हितसंबंध अबाधित राहण्यासाठी तो “अभिजन राष्ट्रवाद” टिकवणे आणि जोपासणे आवश्यक होते. त्यामुळे त्यास पोषक अशी प्रतीके निर्माण करून त्याला शासकीय मान्यता देऊन जनमानसात रुजविणे त्यांच्यासाठी जरुरीचे होते. त्या भूमिकेतून ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून मान्यता पावलेला दिसतो. वास्तविकत: शिक्षकांच्या कृतज्ञतेसाठी गुरुपौर्णिमा हा दिवस भारतात मान्य पावलेला असताना हे नवीन “शिक्षक दिना”चे खूळ या समाजाने आणि सुविद्य म्हणविणाऱ्या समस्त शिक्षक वर्गाने कसे स्वीकारले हे मोठेच आश्चर्य आहे. तेव्हाच्या सत्तारूढ प्रभावळीच्या तथाकथित सर्वधर्मसमभावाला व जातीश्रेष्ठत्वाला पोषक असा आदर्श मुलांना अगदी लहानपणापासूनच द्यावा हा उद्देशही या दिनामागे दिसून येतो.
डॉ. राधाकृष्णन हे शालेय शिक्षक, शिक्षण-शास्त्रज्ञ म्हणून मान्यता पावल्याचे दिसून येत नाही. तथापि एक वैदांतिक तत्वज्ञानी म्हणून त्यांना बऱ्यापैकी मान्यता मिळाल्याचे दिसते. त्यांनी त्या तत्वज्ञानावर बरेच लेखन केले असले तरी त्यात त्यांची स्वयंनिर्मिती नसून शंकराचार्यांच्या केवलाद्वैत मतांची पुनर्मांडणी दिसते. तसेच त्यांची अनेक मते पटण्याजोगी नाहीत. बुद्धाचा अनात्मवाद व वेदांचा ब्रह्मवाद (आत्मवाद) एकच असल्याचे सिद्ध करण्यात त्यांनी व्यर्थ आटापिटा केला. जडवाद व चार्वाकवाद यांच्याशीसुद्धा ते असेच फटकून वागले. जातिव्यवस्थेमुळे हिंदू समाजात काही समस्या निर्माण झाल्या नाहीत उलट हा धर्म टिकून राहिला (संदर्भ- हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ), अशा त्यांच्या विचित्र विचारांचा परखड परामर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “अनिहीलेषण ऑफ कास्ट्स” या ग्रंथात घेतला आहे.
थोडक्यात डॉ. राधाकृष्णन हे आपले दुसरे राष्ट्रपती, भारतरत्न विभूषित महनीय व्यक्तिमत्व असे आपण समजत असतोच. त्यांचा अधिक्षेप करण्याचा कोणताही हेतू येथे नाही. परंतु त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून पाळणे यासाठी कोणताही समर्थनीय आधार मिळत नाही. उलट त्यांच्या उपलब्ध माहितीवरून हा शिक्षक दिन अनुचित मूल्यांचा संस्कार करणारा दिसून येतो. म्हणून हा दिवस शिक्षक दिन असायला नको असे वाटते. शिक्षक दिन पाळायचाच असेल तर ५ सप्टेंबर ऐवजी; समग्र परिवर्तनासाठी “शिक्षणाचा मुलभूत अधिकार नाकारल्या गेलेल्या येथील बहुसंख्य जनतेला” प्राथमिक शिक्षणाचा आधार देऊन नवीन राष्ट्र, नवीन संस्कृती निर्माण करणाऱ्या, शिक्षणामध्ये कितीतरी उपक्रम-योजना-प्रयोग राबविणाऱ्या महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी “शिक्षक दिन” साजरा करणे समर्पक ठरेल. महात्मा फुले यांचा जन्मदिन ११ एप्रिल रोजी येत असल्याने त्या वेळी शाळेत विद्यार्थी नसल्याने त्याचा अपेक्षित परिणाम होऊ शकणार नाही. त्यापेक्षा महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन 28 नोव्हेंबर रोजी येतो तेंव्हा मनवणे योग्य ठरेल किंवा 
सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी रोजी येत असल्याने व त्या वेळी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना पुरेसा वेळ असल्याने या दिवशी शिक्षक दिन साजरा करणे संपूर्ण भारताच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल.

2 Comments

  1. वास्तविक व खरे बोलणं तथा लिहण्यासाठी मोठा जिगर लागतो आणि संपादक ताई तुम्ही आज शिक्षक दिनी वास्तविक व परखड विचार मांडून इतिहासातील खऱ्या व भक्तांना झोबंनाऱ्या गोष्टी लेखातून मांडल्या या बद्दल आपले अभिनंदन
    ज्ञानदाना चे कार्य खऱ्या अर्थाने फुले दाम्पत्याने केले, त्यांच्या मुळेच बहीष्कृत समाज (ओबीसी, एसी, एसटी) शिकू शकला,अन्यथा या वर्गाने शिक्षण घेणे म्हणजे धर्म विरोधी महापाप समजले जात होते.
    याच धर्ममार्तंडांनी त्या वेळेस फुले दाम्पत्य विरोधात आमचा धर्म बुडतो म्हणून थंयथय्यठ केला होता, मुलींना शिक्षण दिल्यास जेवणात किडे पडतात अशी खोटी वावटळ उठवली होती. जीवे मारण्या करिता अंगावर मारेकरी पाठविले, शेण दगडांचा मारा केला इत्यादी त्रास दिला व त्या महान विभूतींनी हे सर्व सहन करत सर्व बहुजन समाजाला शिक्षणाचे दारे उघडली,
    खऱ्या अर्थाने फुले यांच्या नावाने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पाहिजे.

    ज्याने कधीही तळागाळातील समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी कणभर सुद्धा कार्य केले नाही अश्या व्यक्तीच्या नावे पुरस्कार देने हा शिक्षकाचा अपमान आहे.

Leave a Reply

Back to top button