दिंडोरी तालुक्यात स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षारोपण लागवड
सुनील घुमरे नाशिक प्रतिनिधी
स्वराज्य संवर्धन बहुद्देशीय संस्थेच्या वतीने न्याहरी माता डोंगर येथे सालाबादाप्रमाणे या वर्षी पण वृक्षारोपण करण्यात आले.संस्था चार वर्षापासून नियमित पणे दिंडोरी परिसरात वृक्षारोपण व वर्षभर त्याचे संगोपन करता आली आहे. त्याच बरोबर पुरातन गड किल्ले,वाडे,बारवा इ.संवर्धनाचे काम मागील काही वर्षापासून करत आली आहे. याकामी वेळोवेळी वन विभागाचे व पुरातत्त्व विभागाचे मार्गदर्शन सहकार्य संस्थेला मिळत आले. वृक्षारोपण संस्था वनविभाग हद्द ,ग्रामपंचायत हद्द अशा ठिकाणी करत असल्याकारणाने भरपूर ग्रामस्थांचे पण पाठबळ मिळत असते.संस्था मानवी वृक्षतोड तसेच वणवे यापासून जंगलांचे,वृक्ष संपदा पशुपक्षी शिकार बंदी यासाठी नेहमी दक्ष राहून काम करते,त्याच प्रमाणे या वर्षाचा वृक्षारोपण शुभारंभ भरपूर पाऊस झाल्यानंतर दिनांक २३ जुलै २०२२ रोजी न्याहारी माता डोंगर पायथा येथून केलेला असून वृक्षारोपणासाठी आठ ते दहा फूट उंचीचे वड,पिंपळ,करंज,हरड,बेवडा,अर्जुन,करवंद अशा जंगली व दीर्घायुष्यी झाडांची रोपांची निवड केलेली आहे. त्याचबरोबर मोठे मोठे चर खोदून त्या शेजारी वृक्षारोपण संस्थेने केले आहे या कामी संस्थेचे भरपूर सदस्य मेहनत घेता आहेत. न्याहारी माता वृक्षारोपनासाठी संस्थापक भाऊसाहेब चव्हाणके,भाऊसाहेब कुमावत,सचिन भामरे,राजेंद्र कट्यारे,नितीन ठाकरे,मनोज सोमवंशी,सजन फलाने,बापू भेरे,अमोल घोलप,अमोल सोमवंशी,दिलीप सोनवणे,रोशन संधान,नंदु कदम,भीमराव शिंदे,अक्षय वाळुंज,शांतिगिरी वाळुंज,मच्छिंद्र गायकवाड,गणेश कांडेकर,साहिल बागुल,गौरव इचाळ,सचिन आचारी,सुयशा चव्हाणके,साहिल सोनवणे,रुद्राक्ष चव्हाणके,सोहम सोनवणे,क्रांती चव्हाणके,अनन्या ठाकूर योगदान दिले






