Amalner

? अवैध वाळू वाहतूक प्रकरण…. तलाठ्यांवर हल्ला करून मारहाण केल्याप्रकरणी बबलू राजेंद्र तायडे यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल..

? अवैध वाळू वाहतूक प्रकरण….
तलाठ्यांवर हल्ला करून मारहाण केल्याप्रकरणी बबलू राजेंद्र तायडे यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल..

अमळनेर दि 4 मार्च रोजी भरवस जवळ अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या गाडीला महसूल पथकातील कर्मचाऱ्यांनी अडवून विचारणा केली असता वाळू चोरांनी महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवत मारहाण केली.या संदर्भात मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून जिवे मारण्याचा प्रयत्न , सरकारी कामात अडथळा आणणे आणि गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष पारधे यांनी मारवड पोलीस स्टेशनला
फिर्याद दिली की पांझरा नदीवरून वाळू
चोरी होत असल्याची माहिती मिळल्यावरून
तहसीलदार मिलिंद वाघ यांनी पारधे यांच्यासमवेत धीरज देशमुख , प्रथमेश पिंगळे ,हर्षवर्धन मोरे या तलाठ्यांना अवैध गौण खनिज पकडायला पाठवले होते. त्यावेळी भरवस गावपुढे रेल्वे पुलाच्या अलीकडे निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक होत
असल्याचे दिसले. यावेळी ट्रॅक्टर थांबवून जमा
करण्याचा प्रयत्न केला असता बबलू राजेंद्र तायडे व इतर ८ ते १० वक्तींनी पारधे याना पावडीच्या दंडक्याने डोक्यावर , मानेवर , पायावर मारहाण केली. हल्लेखोरांनी पिंगळे यांच्या मोटरसायकलची किल्ली काढली. धीरज देशमुख यांनी तायडे याच्या हातातील दांडका हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असता देशमुख यांच्या मानेवर काठीने मारहाण केली. इतरांनी दगडांनी मारहाण केली व ट्रॅक्टर पळवून नेले.तसेच 10 ग्राम सोन्याची साखळी गहाळ झाली आहे अशी तक्रार दिली आहे.

यानुसार भादवी 353,307, 379,324,337
,323,504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button