Maharashtra

साईबाबा संस्थान मधील बायोमेट्रिक कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्यास राष्ट्रवादी व काँग्रेस करणार भिख माँगो आंदोलन .विशाल भडांगे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक

साईबाबा संस्थान मधील बायोमेट्रिक कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्यास राष्ट्रवादी व काँग्रेस करणार भिख माँगो आंदोलन .विशाल भडांगे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक

प्रतिनिधी राहुल फुंदे

सध्या करोना महामारी व लॉकडाऊन मुळे श्री साईबाबा संस्थान सुद्धा बंद असल्याने शिर्डी परिसरातील नागरिकांबरोबरच संस्थांमधील कंत्राटी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे. श्री साईबाबा संस्थान मध्ये येणाऱ्या भक्तांना दर्शनासाठी संस्थानने बायोमेट्रिक पासची सुविधा केली असून सदर बायोमेट्रिक पास साठी संस्थाने तिरुपती येथील त्रिलोक एजन्सीला कामकाज दिलेले आहे. या एजन्सी मध्ये शिर्डी परिसरातील 65 ते 70 कामगार हे कंत्राटी म्हणून कार्यरत आहेत. या कंत्राटी कामगारांचे फेब्रुवारी महिन्यापासून एजन्सीने पगार न केल्याने या कामगारांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली असल्याने या कामगारांच्या पगाराचा प्रश्न श्रीसाईबाबा संस्थान नी तातडीने सोडविणे आवश्यक आहे. या कामगारांच्या पगाराचा प्रश्न येथे आठ दिवसात न सुटल्यास शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या व इतर शासकीय कार्यालयासमोर तसेच मुख्य चौकांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कंत्राटी कामगारांना सोबत घेऊन भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिर्डी शहर च्या वतीने विशाल भडांगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष यांनी दिलेला आहे. याबाबत विशाल भडांगे यांनी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय नामदार अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री, माननीय नामदार दिलीप वळसे पाटील, कामगारमंत्री, माननीय नामदार धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री, नगरचे पालकमंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ, मा. जिल्हाधिकारी अहमदनगर व त्रिलोक एजन्सी शिर्डी यांना सदर कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button