Maharashtra

संकटकाळात रक्तदान करुन कोरोना विरोधी युध्दात सहभागी व्हावे – सरपंच रवींद्र पाटील

संकटकाळात रक्तदान करुन कोरोना विरोधी युध्दात सहभागी व्हावे – सरपंच रवींद्र पाटील

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: सध्या देश खुप मोठ्या संकटातून जात आहे.कोरोना सारख्या महामारी विरूद्ध जागतिक पातळीवर युध्द सुरु आहे. भारत आणि महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा विळखा असून सध्य स्थितीला रक्ताचा प्रचंड मोठा तुटवडा जाणवत आहे. यासाठी १४ एप्रिल रोजी कांदलगांव ग्रामपंचायत ने रक्तदान शिबीराचे अायोजन केले असून कांदलगांव करांनी यात सक्रिय सहभाग नोंदवून कोरोना विरूद्धच्या युध्दात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन कांदलगांव चे सरपंच रवींद्र पाटील यांनी केले आहे.

सरपंच रवींद्र पाटील म्हणाले कि, ही लढाई केवळ कोणा एकट्याची अथवा एखाद्या प्रांताची नाही. तर अखंड मानवजातीचे आणि कोरोनाचे हे जागतिक पातळीवरील युध्द आहे. सध्या आपल्या राज्याचा देशात अव्वल स्थानी क्रमांक असून ही लढाई जिंकण्यासाठी डाॅक्टर,पोलिस प्रशासन अत्यंत चोख सेवा बजावत आहेत. तर पत्रकारांच्या माध्यमातून देश पातळीवरील नव्हे तर अखंड जगातील कोरोनाचे तांडवाचे वार्तांकन आम्हाला पहायला मिळते. अशा स्थितीत रक्त साठ्याचा प्रचंड तुटवडा राज्यात निर्माण झाला असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. त्यांच्या विनंतीचा गंभीर विचार करुन कांदलगांव ग्रामपंचायत ने शासनाचे सर्व नियम व सोशल डिस्टंन्सिंग पाळून दि.१४ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. यात गावातील सर्व महीला व पुरुष नागरिक,युवा पिढी यांनी देशाप्रती प्रेम म्हणून व संकटात देशाला खंबीर साथ देण्यासाठी अधिकचा सहभाग नोंदवावा असे पाटील म्हणाले.

११ एप्रिल रोजी महात्मा जोतिराव फुले यांची व १४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची असणारी जयंती या महापुरुषांच्या जयंती निमित्त व देशावरील कोरोनाचे संकट पाहून हा सामुहिक उपक्रम ग्रामपंचायत ने राबवला असुन या रक्तदान शिबीरात ज्या नागरिकांना सहभाग नोंदवायचा आहे अशांनी ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग इंगळे राजू मदने, संतोष बाबर, या व्यक्तींना संपर्क साधून रक्तदात्यांनी पुर्वनोंदनी करावी असे ग्रामपंचायत कडून सांगण्यात आले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button