Amalner

सरस्वती विद्या मंदिर शाळेत”वाचू आंनदे” कार्यक्रम संपन्न

सरस्वती विद्या मंदिर शाळेत”वाचू आंनदे” कार्यक्रम संपन्न

अमळनेर( )येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत दिवंगत राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘पुस्तक प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात येऊन “वाचू आंनदे” कार्यक्रम घेण्यात आला.
दिवंगत राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले.सदर दिवस वाचन दिन म्हणून साजरा करतांना शाळेतील ग्रंथ, पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.तर ‘वाचू आनंदे’ या उपक्रमात विद्यार्थ्यांना पुस्तक प्रदर्शनातील पुस्तक वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे पुस्तक वाचनाचा लाभ घेतला.यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऋषीकेश महाळपूरकर,धर्मा धनगर, उपशिक्षिका सौ.संगिता पाटील, शिक्षक आंनदा पाटील, परशुराम गांगुर्डे, आदिंनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button