Faijpur

ज्ञान भाषा हिंदीला विश्व भाषा बनवीण्याचे उत्तरदायित्व सर्वच भारतीयांचे – प्रा डॉ जयश्री गावित

ज्ञान भाषा हिंदीला विश्व भाषा बनवीण्याचे उत्तरदायित्व सर्वच भारतीयांचे – प्रा डॉ जयश्री गावित

हिंदी भाषा अतिप्राचीन असून संपर्क भाषा म्हणून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र गुंफून स्वातंत्र्य प्राप्तीची उज्वल प्रेरणा ठरलेल्या हिंदी भाषेला विश्वभाषा बनवण्याचे उत्तरदायित्व आपल्या सगळ्यांचे असून फक्त 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा न करता सर्वांनी हिंदी भाषेला आपल्या दैनंदिन जीवनात ढळ स्थान दिले पाहिजे. साहित्याच्या माध्यमातून विविध लेखकांनी ब्रिटिशांच्या गुलामगिरी विरुद्ध एकतेचा नारा देऊन सर्व भारतीयांना प्रांत, धर्म, जात यांच्या पलीकडे जाऊन एका सूत्रात बांधले. महाराष्ट्राचे वैभव असणारे कै लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी हिंदी राष्ट्रभाषा प्रसार व प्रचार समिती, वर्धा च्या माध्यमातून वैश्विक पातळीवर हिंदीला विश्वभाषा म्हणून मान्यता मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या मौलिक कार्याची दखल घेऊन आपण सर्वांनी हिंदीला लोकभाषा व प्रशासनाची भाषा म्हणून नावारूपाला आणणे हे सर्वांची उत्तरदायित्व आहे असे मत प्राध्यापिका डॉ जयश्री गावित, सहयोगी प्राध्यापिका, विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे यांनी व्यक्त केले.

तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवसाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ अनिल भंगाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख डॉ जगदीश पाटील, लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत, डॉ आय पी ठाकूर, डॉ विजय सोनजे, प्रा एस डी पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ कल्पना पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी हिंदी विषयाचा इतिहास व परंपरा यावर सविस्तर विवेचन करून आजची हिंदी भाषा व उद्याची हिंदी भाषा यावर विश्लेषनात्मक मत मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ अनिल भंगाळे यांनी हिंदी भाषेची गौरवशाली परंपरे ची स्तुती करीत देशाची अखंडता व एकता अबाधित राखण्यासाठी दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा उपयोग जास्तीत जास्त केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली व हिंदी विभागाच्यावतीने आयोजित उपक्रमाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

दरवर्षी हिंदी विभागाच्यावतीने हिंदी दिवसाच्या औचित्याने हिंदी सप्ताह चे आयोजन केले जात असून त्यात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, काव्यवाचन, रांगोळी, चित्रकला आदि स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेची गोडी वृद्धिंगत करण्याचे प्रयत्न केले जातात. यावर्षी कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यात मोठ्या संख्येने प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
हिंदी दिवस कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष मा श्री शिरीषदादा मधुकरराव चौधरी, आमदार, रावेर विधानसभा मतदारसंघ, उपाध्यक्ष प्रा डॉ सुधाकर काशिनाथ चौधरी, उपाध्यक्ष श्री दामोदर हरी पाटील, चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, व्हाईस चेअरमन प्रा किशोर रामदास चौधरी, सचिव प्रा मुरलीधर तोताराम फिरके, सदस्य प्रा पी एच राणे, श्री मिलिंदबापू वाघुळदे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य डॉ अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा दिलीप तायडे, उपप्राचार्य प्रा डॉ उदय जगताप यांनी शुभेच्छा व मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आभार डॉ विजय सोनजे यांनी तर सूत्रसंचलन प्रा एस डी पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button