आदर्श सरपंच शुभांगी परीट यांचा सत्कार संपन्न
कोल्हापूर प्रतिनिधी-सुभाष भोसले
अन्न नागरी पुरवठा व तहसील कार्यालय भुदरगड व आखिल भारतीय ग्राहक पंचायत भुदरगड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक प्रबोधन सप्ताह सांगता समारंभ कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी येथे झाला यावेळी गरूड भरारी फाउंडेशनचा
राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संघटीका सौ शुभांगी यशवंत परीट यांचा सत्कार जिल्हा अध्यक्ष अरुण यादव यांचे हस्ते झाले यावेळी प्रा. अर्जुन आबिटकर, प्राचार्य पी. बी. पाटील , जगन्नाथ जोशी व ग्राहक पंचायत चे प्रा.डॉ. सागर पोवार ,अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पी बी पाटील , जिल्हा संघटक श्री जगन्नाथ जोशी जिल्हा सहसंघटक प्रशांत पुजारी, विभागप्रमुख श्री रमेश पाटील, तालुका अध्यक्ष कुंडलीक शिर्सेकर. संघटक श्री सागर पोवार सचिव श्री आर. पी. पाटील, कोषाध्यक्ष दयानंद सुतार,सहसचिव हेमंत थडके, शहर अध्यक्ष सुधिर कुरळे, मा संघटक युवराज पाटील . श्री सुरेश सुर्यवंशी, प्रमोद मस्कर, शेखर पाटील, जिल्हा महिला सदस्या सौ. मनाली स्मार्थ, तालुका माहिला अध्यक्षा सौ. ऐश्वर्या पुजारी, संघटीका , सौ वनिता सुतार, सौ संजीवनी सुतार ग्राहक पंचायतीचे सन्मानिय सदस्य ,कॉमर्स कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थानी , वाणिज्य मंडळाचे अध्यक्ष आकाश पाटील व सदस्य, प्रा. स्वप्नाली मोरे, प्रा. व्ही.डी. पाटील , कुंडलीक शिर्सेकर इत्यादि हजर होते.
यावेळी सौ शुभांगी यशवंत परीट म्हणाल्या की,आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे व मार्गदर्शनामुळेच मला सदैव काम करण्याची ऊर्जा मिळते त्यामुळेच मडिलगे गावात मी जनकल्याणाची कामे करू शकले. त्यामुळेच आदर्श सरपंच हा पुरस्कार जाहीर झाला याबद्दल मी सर्वाचे मनःपूर्वक आभार मानते.






