?️अमळनेर कट्टा..तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या शून्यावर..? आणि सोमवार पासून कडक लॉकडाऊन..!अमळनेर च्या तुघलकी प्रशासनाचा तुघलकी निर्णय..!
अमळनेर तालुक्यात कालच्या दिवस दिलासादायक होता.काल तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. यामुळे तालुक्यातील परिस्थिती बऱ्या पैकी आटोक्यात आली आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या दिलासादायक परिस्थितीत अमळनेर च्या तुघलकी प्रशासनाने उद्या पासून म्हणजे सोमवार पासून कडक लॉक डाऊन करणार असल्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत जेंव्हा परिस्थिती अत्यन्त खराब होती तेंव्हा प्रशासनाने कोणत्याही कडक उपाययोजना अंमलात आणल्या नाहीत.संचारबंदी फक्त नावाला च होती.प्रत्यक्षात मात्र संचारसंधी होती असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या संदर्भात ठोस प्रहारने ही कसली संचारबंदी ही तर संचारसंधी ह्या मथळ्याखाली बातमी देखील प्रकाशित केली होती.
आता प्रशासनाने कोणालाही विश्वासात न घेता दोन चार डोके मिळून आज फतवा काढला की सोमवार पासून कडक लॉक डाऊन राहील म्हणे..! हा तुघलकी निर्णय घेणारे तुघलकी विचारांचे अधिकारी अमळनेर तालुक्याला लाभले आहेत.आधीच सामान्य माणूस लॉक डाऊन,कोरोना आणि बिघडत चाललेली आर्थिक स्थिती यामुळे संकटात आहे.जेमतेम उदर निर्वाह करणाऱ्या लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे.तालुक्याची स्थिती सुधारली आहे तर उलट सामान्य माणसाला दिलासादायक असा निर्णय घेऊन सामान्य जनतेला पाठींबा देणे आवश्यक असताना हा निर्णय परस्पर घेणे योग्य नसल्याची चर्चा सुरू आहे.






