Amalner

?️अमळनेर कट्टा.. बॅनर बाजी..कार्यवाही…!आणि नागरिकांचा  पोलीस ठाण्यात ठिय्या..!

?️अमळनेर कट्टा.. बॅनर बाजी..कार्यवाही…!आणि नागरिकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या..!

अमळनेर येथे काल रात्री उशिरा अमळनेर पोलीस ठाण्यात काही लोकांनी ठिय्या आंदोलन करत नगरपरिषदेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन केले. याबाबतीत अधिक माहिती अशी की अमळनेर शहरात विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. यात काही जैन धर्मीय तर काही राजकीय बॅनर आहेत.यात जैन धर्मीय बॅनर फाडून टाकण्यात आल्याचे सांगत काही लोकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. नगरपालिकेचा जाहिरात कर बुडवणाऱ्या डिजिटल प्रेसवाल्यांचे बॅनर फाडून पालिकेने कारवाई करत आहे.परंतु ठराविक समाजाचेच बॅनर फाडण्यात आल्याचे सांगत काही नागरिकांनी रास्ता रोको करत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.रात्री उशिरापर्यंत हा ठिय्या आणि निषेध व्यक्त केला जात होता.

अमळनेर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, मुकादम अनिल बेंडवाल, मुकादम अनिल बाविस्कर, सुधाकर बिऱ्हाडे, गणेश ब्रम्हे इ शहरातील विविध भागांतील अवैध रित्या लावलेले बॅनर फलक काढून सुंदर शहर स्वच्छ शहर ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणत आहेत.या अनुषंगाने अनेक ठिकाणी विविध जाहिरातीचे लावलेले डिजिटल बॅनर फाडून कारवाई करत आहेत. गेल्या वर्षभरापासून पालिकेला जाहिरातीच्या कराची रक्कम जमा न केल्याने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाईसाठी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले असता त्यांनी टाळाटाळ केल्याने स्वच्छेने इतर कामगारांना मदतीसाठी घेतल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.

दरम्यान, ठराविक समाजाचे बॅनर फाडल्याप्रकरणी उप मुख्याधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात यावी, यासाठी पाचपावली देवी मंदिराजवळ रास्ता रोको करून त्यानंतर पोलिस स्टेशनला मोर्चा काढण्यात आला होता.संबधित गोष्टीशी पोलीस विभागाचा काहीही संबंध नसताना पोलीस अधिकारी कर्मचारी यांना विनाकारण सकाळी 3 वाजेपर्यंत वेठीस धरले आहे.नगरपरिषद आणि त्यांचे कार्यक्षेत्र यात अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचा संबंध होता.रात्री उशिरापर्यंत शेकडो लोकांनी न सांगता रस्ता रोको केला..पोलीस ठाण्यात ठिय्या केला..! यात फक्त स्टंट बाजी दिसून आली. योग्य दिशेने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

अमळनेर नगरपरिषदेने देखील सर्वांनाच नियम सारखे करणे आवश्यक आहे. शहरात अनेक बॅनर आहेत ते ही काढून पारदर्शक कारभार असल्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button