कागल येथे विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी संपन्न..
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : कागल मधील शाहू हायस्कूल मौदानात १६ वर्षाखालील मुलांची विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी संपन्न झाली.सदर संघ पन्हाळा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनियर अजिंक्य स्पर्धेसाठी खेळणार आहे. या निवडी प्रसंगी महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव बाळासाहेब सुर्यवंशी,माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, राष्ट्रीय व्हॉलीबॉल कोच महेश शेडबाळे, चंद्रकांत कासोटे, प्रंशात दळवी,माजी राष्ट्रीय खेळाडू समीर खोडवे,संदिप शिंदे, योगेश माडवकर,प्रंशात म्हातुकडे,अमोल सुतार उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रविण मोरबाळे तर आभार वैभव आडके यांनी मानले. विभागीय संघ पुढील प्रमाणे करण फराकटे कोच,अभिषेक भुरले संघव्यवस्थापक,विवेक साळोखे कर्णधार, जीवक वाघमारे, विनित चव्हाण, मयुर सुतार, सुमित पाचगावे,मयुर कदम, विजय निमंग्रे, राजवर्धन पाटील, कुणाल साळगावकर, आदित्य मांगले, मानव साठे,तनिष खरात






