शिरूड कडे दोन्ही माजी आमदारांनी वेधले लक्ष प्रतिबंधात्मक उपयोजना तात्काळ फवारणीला सुरुवात..
रजनीकांत पाटील
अमळनेर : काल प्राप्त झालेल्या अहवालात आर. के. नगर भागात राहणाऱ्या एका बधित शिरूड गावात प्रॅक्टिस डॉक्टर म्हणून काम करत संपर्कात शिरुड येथील अनेक जण आले आहेत. त्यामुळे गावात प्राथमिक उपाययोजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. चौकाचौकात शुकशुकाट पसरला असून घरातून कोणीही बाहेर पडत नाही आहे. सकाळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी गावात फवारणीसाठी ट्रॅक्टर व औषधी उपलब्ध करुन दिले. यावेळी माजी सरपंच महेद्र काका, डी. ए. धनगर सर, अमित पाटील भावडू महाजन, सरपंच सुपडू पाटील पोलीस पाटील व ग्रामसेवक सूर्यवंशी भाऊसाहेब, रजनीकांत पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून फवारणी करून घेतली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर रणाळकर यांनी ही स्वतः गावात भेट दिली. आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका ह्या घरोघरी जाऊन सर्वे करीत आहेत.
तसेच संध्याकाळचच्या वेळस नगरपरिषद च्या माध्यमातून मा. आ साहेबराव पाटील व अमळनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ पुष्पलता ताई पाटील यांच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बँक संचालिका सौ तिलोत्तमा पाटील यांनी देखील संपूर्ण गावात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायजर फवारणी करून घेतली या वेळी सौ तिलोत्तमा ताई सरपंच ,ग्रामसेवक,पोलीस पाटील तालुका आरोग्य अधिकारी गिरीष गोसावी ,वैद्यकीय अधिकारी डॉ रनाळकर,आरोग्य सहाय्यक बी बी चौधरी,आरोग्य सेविका अनिता पाटील, अशा सेविका आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती






