Amalner

७६ वर्षात प्रथमच द्रौ.रा.कन्याशाळेचा वर्धापनदिन विद्यार्थिनींच्या अनुपस्थितीत ‘लॉकडाउन’.

७६ वर्षात प्रथमच द्रौ.रा.कन्याशाळेचा वर्धापनदिन विद्यार्थिनींच्या अनुपस्थितीत ‘लॉकडाउन’.

नूरखान

अमळनेर शहरातील नामवंत अशा द्रौ.रा.कन्याशाळेची स्थापना २३ जुलै १९४४ रोजी झाली होती.तालुक्यातील मुलींसाठी प्रथमच स्थापन झालेली स्वतंत्र शाळा आहे.तेव्हापासुन दरवर्षी २३ जुलै हा शालेय वर्धापनदिन म्हणुन साजरा करण्यात येतो.यादिवशी शाळेत कार्यक्रमांची रेलचेल असते, यात प्रामुख्याने एस.एस.सी.बोर्डात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा गुणगौरव तसेच ई.५ वी ते ९ वी सर्व तुकड्यांतून प्रथम आलेल्या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात येतो.

विद्यार्थिनींच्या स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या फुलवात या अंकांचे प्रकाशन यादिवशी करण्यात येते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन शाळेच्या माजी विद्यार्थिनी ज्या महत्वाच्या अशा पदावर कार्यरत आहेत ज्यांच्या पासुन प्रेरणा घेऊन सध्याच्या विद्यार्थिनी योग्य दिशेने वाटचाल करतील अशी आशा निर्माण होते. उत्सवासारखे वातावरण त्या पूर्ण आठवड्याभर शाळेच्या पटांगणात चालत असते.शाळेला एक नवीन झळाळी या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाने मिळत असते.नाशिक विभागात सर्वात जास्त विद्यार्थिनी संख्या असलेल्या मोजक्या शाळेत द्रो.रा.कन्याशाळेची वाटचाल यशस्वीरीत्या सुरू आहे.

परंतु कोरोनाच्या या संकटात शाळेचा ७६ वा वाढदिवस प्रथमच विद्यार्थिनींच्या अनुपस्थितीत पार पडला.प्रतिमा पुजन करण्यात येऊन साध्या पद्धतीने वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री सोनवणे, उपमुख्याध्यापक धनराज ठाकूर,पर्यवेक्षक कल्पना गरुड,ए.पी.वाणी,शिक्षक प्रतिनिधी व्ही.व्ही.कुलकर्णी,एस.पी.
बाविस्कर,विनोद कदम तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेच्या प्रगतीचा आलेख नेहमी असाच उंचावत राहो यासाठी खा.शि.मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छापर संदेश पाठवले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button