Kolhapur

आमदार प्रकाश आबिटकर यांचा महाराष्ट्र मराठी 7 न्यूज तर्फे सत्कार

आमदार प्रकाश आबिटकर यांचा महाराष्ट्र मराठी 7 न्यूज तर्फे सत्कार

सुभाष भोसले-कोल्हापूर
भुदरगड राधानगरी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांचा महाराष्ट्र मराठी 7 न्यूज तर्फ सत्कार करणेत आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देणेत आल्या.
यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी सुभाष भोसले,प्रा तुकाराम पाटील ,प्रशांत देसाई,युवराज सुर्वे ,बाबूराव कांबळे उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर म्हणांले की,जनसामान्यांच्या ताकदीवर हे यश मिळाले.या सत्तेचा उपयोग राधानगरी ,भुदरगड ,आजरा मतदारसंघातील लोकांच्या हितासाठी करेन.ते म्हणांले की ,मी पुढाऱ्याचां पुढारी नसून सर्वसामान्य जनतेचा सेवक आहे.
सलग दुसऱ्यांदा आमदार करून जनतेने माझ्यावरचा विश्वास सार्थ ठरविला.भविष्यात या मतदारसंघात युवकांसाठी रोजगार निर्माण करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प उभारणेत येतील .शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणेचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button