Maharashtra

चाळीसगाव तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना स्वतंत्र रुग्णवाहिका मिळावी व संशयित रुग्णांचे टेस्ट रिपोर्ट तात्काळ उपलब्ध व्हावेत

चाळीसगाव तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना स्वतंत्र रुग्णवाहिका मिळावी व संशयित रुग्णांचे टेस्ट रिपोर्ट तात्काळ उपलब्ध व्हावेत–

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले

आमदार मंगेश चव्हाण यांची आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे मागणी
आरोग्य विभागाच्या रिक्त जागांच्या प्रश्नाकडे देखील वेधले लक्ष
जळगाव – रेडझोनच्या गर्तेत असणाऱ्या चाळीसगाव तालुक्याची भौगोलिक पार्श्वभूमी पाहता जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक धोका चाळीसगाव तालुक्याला होता मात्र जनतेने अतिशय शिस्तीने लॉकडाऊन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. आतापर्यंत तालुक्यात १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यातील एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील शेवटच्या टोकाचा तालुका असल्याने चाळीसगाव तालुक्यातील कोरोना नियंत्रणासाठी शासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे असून चाळीसगाव तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना स्वतंत्र रुग्णवाहिका मिळावी व कोरोना संशयित म्हणून जे रुग्ण आढळतील त्यांचे स्वॅब घेतल्यानंतर त्याचे रिपोर्ट हे २४ तासांच्या आत मिळायला हवेत तसेच चाळीसगाव तालुक्यातील आरोग्य विभागातील डॉक्टर, फार्मासिस्ट, GNM, ANM, Sweeper यांच्या एकूण ५० जागा रिक्त असून त्या तात्काळ भरण्यात याव्यात अशी मागणी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.
देशातील सर्वाधिक मृत्युदर असणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील कोरोना उपाययोजना संदर्भात आढावा बैठक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीशभाऊ महाजन, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी लक्ष वेढलेल्या मुद्द्यांवर आरोग्य मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
#IndiaFightsCorona

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button