? सावधान…अमळनेर नगरपरिषद करतंय नागरिकांची फसवणूक..आणि लूट..न पा शिक्षण कर..!का आणि कशासाठी घेतला जात आहे..?
अमळनेर नगरपरिषदेकडून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची पुराव्यासह माहिती मिळाली आहे. अमळनेर नगरपरिषदेच्या घर टॅक्स पावतीत महा शिक्षण कराचा उल्लेख केलेला आहे.ह्या शिक्षण कराची रक्कम मला उपलब्ध झालेल्या घरपट्टी पावतीत 22/- रु इतकी आकारण्यात येत आहे.विशेष म्हणजे मालमत्ता कर हा वेगवेगळ्या ठिकाण,आणि कॉलनी परिसर या दृष्टीने वेग वेगळा आकारण्यात येतो.ह्या मालमता कराच्या टक्केवारी त हा शिक्षण कर आकारण्यात येत आहे. उदा 574 रु च्या मालमता करावर 22 रु याप्रमाणे..तर न पा शिक्षण कराची रक्कम 29 रु एव्हढी आहे..!दुसऱ्या एका कर पावतीत 4710 रु च्या मालमता करावर महा शिक्षण कर 565/रु तर न पा शिक्षण कर 509 रु एव्हढा आकारण्यात आला आहे.

म्हणजेच जास्त मालमत्ता कर असलेल्या घरांच्या किंमती नुसार valuation कर निर्धारित केला जातो. आणि ह्या कराच्या वेगवेगळ्या टक्क्यांनी महा शिक्षण कर आणि न पा शिक्षण कर आकारला जात आहे.. जो 2% पासून ते 12% टक्क्यांपर्यंत आहे. आता या प्रमाणे अमळनेर शहरातील लोकसंख्या विचारात घेतली तर एकूण रक्कम किती गोळा होते याच गणित जर केलं तर लाखो रु नगरपरिषद अमळनेर शहरातील नागरिकांना उल्लू बनवत वसूल करत आहे. कारण अमळनेर नगरपरिषदेच्या सर्व शाळा बंद झाल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा खर्च नगरपरीषदचा या विशेष टायटल खाली होत नाही. जेंव्हा न पा च्या शाळा सुरू होत्या तेंव्हा शाळांचे व्यवस्थापन, शिक्षकांचे पगार इ साठी हा कर स्वरूपात गोळा केलेला निधी खर्च होत होता परंतु आता मात्र न पा च्या शाळा बंद झाल्या असल्याने हा कर नागरिकांकडून वसूल करणे हे नियमबाह्य तर आहेच पण नागरिकांची आर्थिक फसवणूक आणि शोषण आहे..तेंव्हा नागरिकांनी आता जागृत होण्याची वेळ आली आहे.विशेष म्हणजे जे स्कुल बोर्ड स्थापन करण्यात आले होते ते ही आता बरखास्त झाले आहे.जागृत नागरिकांनी च ह्या विषयी वाचा फोडून हा कर देणे बंद करणे आवश्यक आहे. यासंदर्भात लवकरच मोठे आंदोलन छेडले जाणार आहे हा ही एक इशारा न पा प्रशासनाला देण्यात येत आहे.







