Amalner

मठगव्हाण येथे झाली भर दिवसा झाली चोरी…. एक लाख बेचाळीस हजार रुपयांचा ऐवज लंपास…

मठगव्हाण येथे झाली भर दिवसा झाली चोरी….
एक लाख बेचाळीस हजार रुपयांचा ऐवज लंपास…

अमळनेर :- तालुक्यातील मठगव्हाण येथे सुमारे एक लाख बेचाळीस हजार रुपयांची भर दिवसा चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी काशिनाथ दंगल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मठगव्हाण येथे ते पत्नी योजनाबाई, मोठा मुलगा राहुल व लहान मुलगा शुभम या सह राहतात व शेती व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि .२४ रोजी सकाळी ०७:३० वाजेच्या सुमारास पत्नी व दोन्ही मुले असे शेतात निघून गेले. त्यानंतर स्वतः फिर्यादी सकाळी ०८ वाजेच्या सुमारास घराला कुलुप लावुन घराची चाबी नेहमी प्रमाणे ही खिडकी मध्ये ठेवून शेतात शेती कामासाठी निघुन गेले. त्यानंतर दुपारी 12.00 वा.च्या सुमारास शेताचे काम आटोपुन फिर्यादी एकटे घरी परत परतले असता तेव्हा घराचे कुलुप उघडलेले दिसले व सदर कुलुप चावीसह घराचे दरवाजाचे मुठेला लावलेले दिसले. म्हणुन शंका आल्याने घरात जावुन पाहीले असता लोखंडी गोदरेजचे कपाट मी उघडुन पाहीले असता, गोदरेज कपाट मधील लॉकर उघडे दिसले. तेव्हा सदर लॉकरमधील वस्तुची पडताळणी केली असता सोन्याचे दागिणे व रोख रक्कम हि चोरीस गेल्याचे उघडकीस आले. ४० हजार रुपयांची रोख रक्कम, तीस हजार रुपयांची 10 गॅम वजनाची सोन्याची एक दाणी पोत, नऊ हजार रुपये किंमतीची 3 ग्रॅम वचनाचे सोन्याचे डोरले, अठरा हजार रुपये किमतीचे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, बारा हजार रुपये किमतीचे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे काप, नऊ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाची सोन्याचे अलीफ लैला हार,पंधरा हजार रुपये किंमतीची 5 गॅम वजनाची सोन्याची अंगठी नऊ हजार रुपये किमतीचे 3 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र असे एकूण एक लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दि. २४ रोजी सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरुन नेले आहे म्हणुन अज्ञात चोरट्याविरुध्द कलम ४५४, ३८० प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस हे. काँ. सुनील पाटील हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button