Amalner

अतिवृष्टी / ओला दुष्काळ जाहिर करा..माजी आमदार स्मिता वाघ यांची मागणी

अतिवृष्टी / ओला दुष्काळ जाहिर करा-माजी आमदार स्मिता वाघ यांची मागणी

रजनीकांत पाटील

शेती हा पुर्णतः हवामानावर अवलंबुन असणारा व्यवसाय आहे . शेतकरी आपल्या हाता तोंडाशी आलेला घास वाचविण्यासाठी जिवाचे रान करीत असतो . कोरोनाचा संसर्ग , वादळ , खतांची टंचाई , बोगस बियाणे अशा नानाविध संकटांचा सामना करुन आपले शेत फुलदि असतो . त्यातच आता होणारी अतिवृष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाता – तोंडाशी असलेले मुंग , उडीद या पिकांचे तर नुकसान झालेच . त्यात कुठलेही उत्पन्न त्यास मिळाले नाही . परंतु सद्या तालुक्यात होणाऱ्या अवकाळी अतिवृष्टीमुळे कापुस , मका , ज्वारी , बाजरी या पिकांवर सुध्दा खुप मोठा परिणाम झाला असून . सर्व पिक पुर्णतः वाया गेली आहेत . तालुक्यात सतत होणाऱ्या पावसामुळे पिकांवर वेगवेगळया रोगांचा प्रार्दुभाव होवून पुर्ण पिके खराब झालेली आहेत . तरी तालुक्यातील हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करुन भरीव मदत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यास दयावी याकरीता निवेदन प्रांताधिकारी सीमा आहिरे,तहसीलदार मिलिंद वाघ यांना दिले.

त्यावेळी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे सरचिटणीस जिजाबराव पाटील, राकेश पाटील,विजयसिंग राजपूत,राहुल पाटील,प्रकाश पाटील,राहुल पाटील,मचिंदर राजपूत,शिवाजी राजपूत,अनिल जैन,राहुल चौधरी, निखिल पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button