Amalner

?️अमळनेर कट्टा…आणि स्वागताच्या नादात झाली गर्दी..!सोशल डिस्टंगसिंग चा उडाला फज्जा..! तुम्ही सामान्य नागरिक तुम्हाला नियम..!तुम्ही राजकीय नेते तुम्हाला सूट..!

?️अमळनेर कट्टा…आणि स्वागताच्या नादात झाली गर्दी..!सोशल डिस्टंगसिंग चा उडाला फज्जा..! तुम्ही सामान्य नागरिक तुम्हाला नियम..!तुम्ही राजकीय नेते तुम्हाला सूट..!

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाडळसरे धरणासाठी १३५ कोटींचा भरीव निधी प्राप्त करून घेतला म्हणून आमदार पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले.परंतु हे सर्व करत असताना सर्वांनाच नियमांचा विसर पडला.संपूर्ण जळगांव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रोजच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन नियम लागू करण्यात आले आहेत. संचारबंदी बरोबरच गर्दी टाळणे,मास्क लावणे,सोशल डिस्टनसिंग इ नियमांचे उल्लंघन केले आहे.यावरून सर्व नियम हे सामान्य लोकांसाठी असून स्वतः आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते च नियमांचे उल्लंघन करत आहे. त्यांना कोणतीही अडचण नाही.किंवा त्यांना नियम लागू नाहीत असेच यावरून दिसून येत आहे. वास्तविक जबाबदार लोक प्रतिनिधींनी नियमांचे पालन करत आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे.या उलट लोक प्रतिनिधी च नियमांचे उल्लंघन करत आहेत. सामान्य जनतेला प्रशासनाने वेठीस धरले आहे. रोज च कोणाला न कोणाला प्रशासन दंड करत आहे. बँड आले,भाजी विक्रेते,मंगल कार्यालय,दुकाने,बाजारपेठ इ ठिकाणी गर्दी कटणाऱ्यांना दंड करण्यात येत आहे. हाच नियम आमदार अनिल पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना का लागू झाला नाही?अशी दबक्या आवाजात चर्चा गावात सुरू होती.

याबाबतीत सविस्तर वृत्त असे की अर्थसंकल्पीय अधिवेशनात येथिल पाडळसरे धरणासाठी १३५ कोटींचा भरीव निधी प्राप्त करून घेतला म्हणून पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने आमदार अनिल पाटील यांचे अमळनेर रेल्वे स्थानकावर स्वागत करून सत्कार करण्यात आला.यावेळी गर्दी चे भान ठेवण्यात आले नाही.
अर्थसंकल्पिय अधिवेशनातून अमळनेर येथे गुरुवारी आमदार अनिल पाटील परतले. रेल्वे स्थानकावर यावेळी टोप्या घातलेले पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.असे आमदार कार्यालयातून आलेल्या अधिकृत बातमीतच म्हटले आहे.यावेळी अनेक जेष्ठ वृद्ध नागरिक ही उपस्थित होते व त्यांनी ही कोणतीही काळजी घेतली नव्हती असे स्पष्ट पणे दिसून येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button