Aurangabad

शिवसेनेवर दबाव आणू शकेल इतकी डाॅ. कराड यांची क्षमता नाही – चंद्रकात खैरे

शिवसेनेवर दबाव आणू शकेल इतकी डाॅ. कराड यांची क्षमता नाही – चंद्रकात खैरे

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झालेल्या डाॅ. भागवत कराड यांना थेट अर्थ खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाले. या मंत्रीपदावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, त्यापैकीच एक म्हणजे औरंगाबादेत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने कराड यांना मंत्रीपदाच्या माध्यमातून बळ दिल्याची चर्चा आहे.

यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, शिवसेनेवर दबाव आणू शकेल इतकी डाॅ. कराड यांची क्षमता नाही, शिवसेनेला कुणीच दाबू शकत नाही.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे विचार या शहराला आणि जिल्ह्याला दिले आहेत, त्यामुळे शिवसेनेला शह देण्याची किंवा रोखण्याची हिमंत कुणातच नाही, असे खैरे यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button