Latur

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्कचे  सुशोभीकरण करा अन्यथा आंदोलन छेडणार भिम आर्मी इशारा

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्कचे सुशोभीकरण करा
अन्यथा आंदोलन छेडणार भिम आर्मी इशारा

लातूर:–लक्ष्मण कांबळे
आज दिनांक 12 रोजी लातूरच्या महापौर व महापालिका आयुक्तांना भिम आर्मीचे निवेदन
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क चे सुशोभीकरण करण्यात यावे म्हणून लातुरातील विविध सामाजिक संघटनांनी महापालिका आयुक्त व महापौर याना निवेदन देऊन ही आंबेडकर पार्क च्या कामाला चालढकल करत असले मूळे व महानगरपालिका चा सर्वसाधारण सभेत कामाला मंजुरी मिळाली होती व कामाचे भूमिपूजन करून आता जवळपास दोन ते तीन महिने उलटून ही पार्क च्या कामाला सुरुवात झालेली नाही म्हणून कामाला तात्काळ सुरू करण्यात यावे म्हणून भिम आर्मी च्या वतीने महापालिका आयुक्त व महापौर याना दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली आहे.

जर आंबेडकर पार्क चे काम लवकरात लवकर सुरू नाही केल्यास भिम आर्मी च्या पध्द्तीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे.
यावेळी निवेदनावर भिम आर्मी चे महाराष्ट्र संघटक अक्षय धावरे जिल्हा प्रमुख विलास चक्रे बबलू गवळे व युथ पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साधुभाऊ गायकवाड आदी च्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button