Kolhapur

सरपंच सेवा संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर ऑक्टोंबर महीण्यात शिर्ङीत होणार पूरस्काराचे वितरण

सरपंच सेवा संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

ऑक्टोंबर महीण्यात शिर्ङीत होणार पूरस्काराचे वितरण

कोल्हापूर ःआनिल पाटील

सरपंच सेवा संघातर्फे या वर्षाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील उल्लेखनीय लेखणी करणारे दैनिकातील संपादक व पत्रकार यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिध्दीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जातो.

यामध्ये सुरेश माडकर (दै. जनमत), धनाजी गुरव (दै. पुढारी), दिपक मेटील (दै. लोकमत) महेश गावडे (दै. सकाळ), विक्रम पाटील (दै. लोकमत), कृष्णात जमदाडे (एस.पी.एन न्यूज), उत्तम कागले (दै. कीर्तिवंत), दिलीप जगताप (दै. हिंदूसम्राट), अनिल पाटील (मुक्त पत्रकार)पेठवडगाव , राजू चौगुले (दै.स्वातंत्र्य प्रगती), सागर धुंदरे (दै. पुण्यनगरी), अनिल पाटील (इंडिया स्टिंग), विक्रम धनवडे (मुक्त पत्रकार)भादोले, शिवाजी शिंगे (मीडिया कंट्रोल) आदी दिग्गज पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी सरपंच सेवा संघाचे पुणे विभाग समन्वयक सुरेश राठोड (पत्रकार) यांचे सहकार्य लाभले.

पत्रकार हे पत्रकारितेच्या या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत निस्वार्थ भावनेतून समाजाची सेवा करत राज्यभरातील विविध भागात कायम कार्यरत असतात. ग्रामविकासात भरीव कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवी, राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याचा आढावा घेऊन यांना प्रसिद्धी माध्यमातून योगदान देतात याबद्दल सरपंच सेवा संघ सर्वांचा आभारी आहे व अशीच आपली भरभराट होवो. सदर आपले काम प्रेरणादायी आहे अशी माहिती सरपंच सेवा संघाचे सरचिटणीस बाबासाहेब पावसे पाटील यांनी पत्राद्वारे दिली.
सर्व पत्रकारांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या पूरस्काराचे वितरण आॅक्टोबर महीण्यात “शिर्ङी ” येथे होणाया एका शानदार समारंभात प्रधान करण्यात येणार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button