Aurangabad

“मंत्री सुटले, कार्यकर्ते अडकले”, पाच जणांवर गुन्हा दाखल

“मंत्री सुटले, कार्यकर्ते अडकले”, पाच जणांवर गुन्हा दाखल
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : राज्याचे ‘रोहयो’ मंत्री तथा आमदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते पैठण तालुक्यातील दादेगाव येथे लॉकडाउनमध्ये गर्दी जमवून विकास कामाचे उदघाटन केल्या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात देवगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अन्य अशा पाच जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात मंत्री सुटले व कार्यकर्ते अडकले, अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. पैठण तालुक्यातील देवगाव येथे ‘रोहयो’ च्या विविध विकास कामांचे उदघाटन राज्याचे रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते 5 मे रोजी मोठ्या संख्येने गर्दी जमवून थाटामाटात करण्यात आले होते.
त्यामुळे जनसामान्यातून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी याबाबत मंत्री संदीपान भुमरे यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी आयपीएस पोलीस अधिकारी गोरख भामरे यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, मंत्र्यांवर कारवाई न होता कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाई झाल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button