रायगड जिल्हा परिषद शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाची चौकशी करा:बिरसा क्रांती दलाची मागणी.
Ratnagiri : जिल्हा परिषद रायगड येथे विशेष भरती मोहीम 2019 अंतर्गत जाहिरात क्रमांक .01/019, दिनांक.27/12/2019 मधील परिशिष्ट -अ मध्ये शिक्षण सेवक पदभरती अपात्र विद्यार्थांना पात्र करून भरती नियम बाह्य केल्याची चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई करावी .अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री मा.अजित पवार साहेब ,ग्रामविकास मंत्री, शिक्षण मंञी व प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंञालय मुंबई यांचेकडे दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजीच्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संदर्भ
(1)परिशिष्ट अ मधील पद क्रमांक 8 शिक्षण सेवक .
(2) tait चा शासन निर्णय
(3) महाराष्ट्र शासन निर्णय
संदर्भानूसार विशेष जिल्हा परिषद भरती मधील शिक्षक सेवक संदर्भात बुलढाणा,रायगड ठिकाणी ही भरती नियम बाह्य केली आहे. अपात्र विद्यार्थी पात्र केले आहेत आणि हेच विद्यार्थी सातारा,नागपूर,सांगली याठिकाणी अपात्र केले आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांनबद्द्दल TET,CTET 2018,2019 पास असलेल्या विद्यार्थ्यांनमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण यामध्ये सन 2018,2019.tet CTET पास आहेत यांनी 2017 ला TAIT दिली आहे तरी त्यांची निवड केली आहे हे नियमात बसत नाही कारण यांनी जरी tait दिली आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे 9ते12 साठी पात्र मग हे विद्यार्थी 1ते 8 साठी कसे पात्र केले आणि त्यात dted झालेले विद्यार्थी tet, CTET पास असल्याशिवाय TAIT देता येणार नाही असा tait चा नियम आहे मग यांनी tait कशी काय दिली त्यामुळे आम्ही सगळे 2018 /19 ला tet CTET पास आहोत त्यासाठी इतर विभागाची भरती परीक्षा घेऊन केली त्याप्रकारे करावी किंवा आदिवासी शासकीय आश्रम शाळा भरती परीक्षा घेऊन झाली त्याच प्रकारे ही पण भरती करावी म्हणजे सर्व tet CTET पात्र धारकांना न्याय मिळेल.सर्वांना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा करतो आणि आम्ही सोबतच आवश्यक पुरावे जोडले आहेत .याबद्दल विचार करून पास असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे तो लवकरात लवकर दूर करावा याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती .आपण या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.सदर भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी.अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी शासनाकडे केली आहे.






