Amalner

अमळनेर बसस्थानकावर महीलेची हरवलेली पर्स हवालदार शिंदेनी परत केल्याबद्दल सत्कार

अमळनेर बसस्थानकावर महीलेची हरवलेली पर्स हवालदार शिंदेनी परत
केल्याबद्दल सत्कार

अमळनेर प्रतिनिधी-
अमळनेर बस स्थानकावर एका महीलेची हरवलेली पर्स परत केल्याने पोलीस हवालदार शिंदेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नुकताच हवालदार शिंदेची भेट
बस स्थानकावर भेट घेऊन अमळनेर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष शिक्षण विस्ताराधिकारी पि.डी धनगर व पत्रकार ईश्वर महाजन यांनी त्यांचा शाल श्रीफळ घेऊन सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना हवालदार शिंदे म्हणाले की आतापर्यंत अशा अनेक घटना बसस्थानकामध्ये घडत असताना त्यांचे हरवलेल्या वस्तू मी व आमच्या कर्मचाऱ्यांनी परत केलेल्या आहेत कालची घटना त्याच पद्धतीने होती ही महिला पर्स हरवल्यामुळे चिंताग्रस्त झालेली होती . कारण त्यात महत्वाच्या वस्तू होत्या.
त्या वस्तू परत करताना तिच्या चेहर्यावरचा आनंद खूपच मोठा होता. आपल्यासारख्या व्यक्तीने माझी दखल घेऊन माझा सत्कार केला निश्चितच मला काम करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळेल असे हवालदार निंबा शिंदे यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button