Lonand

लोणंद शहरातील तीस केंद्रामधून पल्स पोलिओ ची मोहीम यशस्वी रित्या कार्यरत…

लोणंद शहरातील तीस केंद्रामधून पल्स पोलिओ ची मोहीम यशस्वी रित्या कार्यरत…

दिलीप वाघमारे

लोणंद शहरातील तीस केंद्रामधून पल्स पोलिओ ची मोहीम उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत बागडे यांनी म्हटले ते पुढे म्हणाले पल्स पोलिओ नष्ट करण्यासाठी मोहीम प्रभावीपणे राबवून राज्य शासनाला सहकार्य केले जाईल त्यासाठी आमच्या उपकेंद्र मधून एकही रुग्ण वंचित राहणार नाही.

लोणंद शहरातील तीस केंद्रामधून पल्स पोलिओ ची मोहीम यशस्वी रित्या कार्यरत...

त्यासाठी लोणंद शहरात सईबाई हाउसिंग सोसायटी मुलींची शाळा जुने हॉस्पिटल रेल्वे टेशन चार मोबाईल पथके ग्रामीण भागात उपकेंद्रात सोय केली आहे बाळू पाटलाची वाडी अंदोरी मरीआईची वाडी खेड बुद्रुक पाडळी बोरी कोपार्डे पाडेगाव या केंद्रांमधील ऐंशी कामगार आशा स्वयंसेविका अंगणवाडी सुपरवायझर लहान बालकांना शून्य ते पाच वर्षापर्यंत बालकांना लस देण्याची मोहीम काळजीपूर्वक हाताळीत आहेत.

राज्यात 1995 साली पल्स पोलिओ सुरू झाला व राज्यांमध्ये 1999 पर्यंत एकही रुग्ण आढळला नाही राज्यामध्ये स्थिती फार चांगली आहे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या मार्फत साडेतीन हजाराचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button