?️अमळनेर कट्टा…फोटो राजकारण….! बाजार समितीत गलिच्छ राजकारण..!”वाघ” गेल्यावर कु..! सुटले..!काहीच उरलं नाही म्हणून शेवटी फोटो वर राग..!
?कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या तीव्र भावना…!
?? विकास कामे करा फोटो आपोआप लागतील..!
?? तुमचे ही फोटो ठेवा आणि दुसऱ्यांचा फोटो का काढता..?
?? मागच्या दरवाज्याने आलेल्यांनी फोटो बाजी करू नये..!
अमळनेर येथे दिवसागणिक एक ना एक विचित्र प्रकार पाहवयास आणि ऐकावयास मिळत आहेत.काल परवा काय तर म्हणे बॅनर प्रकरण..! अर्थात घडविलेलं..!आज काय तर बाजार समितीत वाघांचा फोटो काढून टाकला आणि त्याजागी दुसरे फोटो लावण्यात आले.. काय झालं ह्या शहराला आणि शहरातील लोकांना..! अरे कुठे नेवून ठेवलय आमचं अमळनेर..! याबाबतीत सविस्तर वृत्त असे की अमळनेर बाजार समितीच्या कार्यालयात दिवंगत उदय वाघ यांचा फोटो लावण्यात आलेला होता. उदय वाघ आणि कृ उ बाजार समिती यांचे खूप जुने नाते तर आहेच पण बाजार समितीत अनेक विकास कामे केली आहेत.अनेक नवीन गोष्टींचा पायंडा त्यांनी आपल्या कारकिर्दीत बाजार समितीत घातला याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत.अशी माहिती मिळाली आहे.
उदा..ही कामे…
. जिल्हा बँक, शेतकऱ्यांचा सोईसाठी बाजार समिती आवारात स्थलांतर केली
. माल उतरवण्यासाठी मोठे कैची शेड व T.M.C शेड उपलब्ध.
– पेमेंट घेण्यासाठी आडत दुकानाच्या सुविधायुक्त इमारती उपलब्ध.
. शेतकऱ्यांसाठी बाजार समिती आवारात जवळच पिण्याचा पाण्याची सोय व्हावी
म्हणून प्रवेशद्वार जवळ पाणपोई सरू करण्यात आली आहे.
– गुरे बाजार प्रकल्प जवळच पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकाम करण्यात आले.
. पुरुषांसाठी व स्त्रीयांसाठी आधुनिक शौचालय व स्वछता गृह.
– यार्डवर मोजमापसाठी में टन व ६० मे टन इले. भुई काटा.
. बाजार समिती तसेच वरिष्ठ खात्याकडून येणाऱ्या सूचना तसेच दैनंदिन
. कामकाज, रेकॉर्ड, जमा खर्च, इत्यादी कामकाज बाजार समिती कर्मचारी
चोखपणे व तत्परपणे करतात.
– कृषी क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुन
शेतीमालाचे अधिक उत्पादन काढुन शेती व कृषी क्षेत्राला प्रेरणा देणाऱ्या
शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना “कृषीरत्न” पुरस्कार योजना.

असे सर्व असतांना आज अत्यन्त गलिच्छ आणि खालच्या पातळीवर जात दिवंगत उदय वाघ यांच्या प्रतिमेला काढून टाकत तीन नवीन फोटो लावण्यात आले. अमळनेर ला एक अत्यन्त उत्कृष्ट असा राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्मिक वारसा लाभलेला आहे.या शहराने दिगग्ज राजकारणीच पहिलेच नव्हे तर दिगग्ज राजकारणी घडविले देखील आहेत..! ह्या अमळनेर नगरीत जातीयवादी राजकारण करत गेल्या काही वर्षात अमळनेर चे राजकारण झपाट्याने घाणेरड्या मार्गावर गेले आहे. पैसा आणि जातीयवाद असे समीकरण करत राजकीय सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला गेला. आणि शहराचं वातावरण खराब केलेलं आहे.अशी सध्या अमळनेर शहरातच नव्हे तर तालुक्यात चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीत आमचे ‘ठरले आहे’ म्हणत जातीय वादी प्रवृत्तीने भाऊबंदकी करत उदय वाघ यांची साथ घेऊन आमदारकी पदरात पाडून घेतली आणि आता गरज सरो वैद्य मरो..! ही भूमिका घेत दिवंगत उदय बापू यांच्या प्रतिमेवर राग काढत संधी साधू राजकारण करण्यात येत आहे.
दिवंगत माणसावर असा राग काढण्याचे कारण काय? वाघ यांचाच फोटो कुणाला नडत होता? खालच्या पातळीवरील राजकारण केले जात आहे. हिम्मत असेल तर समोरा समोर शह द्या,विरोध करा..!ज्यांच्या जीवावर सत्ता उपभोगता आहेत कमीत कमी त्यांना तरी विसरू नका. लोकही पाहत आहेत हे ही विसरू नकायाचं योग्य वेळी योग्य उत्तर ही दिल जाईल हे ध्यानात ठेवा..!अशी अत्यन्त तिखट प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चाचे युवक नेते राकेश पाटील यांनी ठोस प्रहारशी बोलताना दिली आहे.







