Amalner

मुस्लिम बांधवाना ईद साठी केली आर्थिक मदत…

मुस्लिम बांधवाना ईद साठी केली आर्थिक मदत…

नूरखान

अमळनेर :- शहरातील हातावर पोट असणाऱ्या मुस्लिम बांधवांना ईद साजरी करता यावी, याकरता माजी आ. साहेबराव पाटील यांनी आर्थिक मदत केली आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून दि.२४ मार्च २०२० पासून सातत्याने ४ थ्या लाॅकडाऊनची मुदत ३१ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अंग मेहनतीचे श्रम करत उपजिविका भागविणा-या मुस्लिम बांधवांच्या कुटूंबियांना रमजान ईद हा पवित्र सण साजरा करता यावा, ह्या हेतूने २५० कुटूंबांना रु.७५ हजार रुपयाची आर्थिक मदत मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी दिली. आहे. त्याबद्दल अॅड.सलीम शेख, नगरसेवक शेखा हाजी, फयाजदादा पठाण,मुख्तार खाटीक, इम्राण खाटीक, शफी मास्तर आदींनी आभार मानले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button