? ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न..निवडणूकीचे काम निर्भयपणे आणि जागरूकतेने पार पाडा.. मिलिंदकुमार वाघ
अमळनेर
अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत च्या
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवाजी महाराज नाट्य गृहात एक दिवसीय प्रशिक्षण तहसीलदार आणि निवडणूक अधिकारी मिलिंदकुमार वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य
प्रामाणिकपणे व निर्भीडपणे पार पाडावे.तसेच
निवडणूक प्रक्रियेतील कर्तव्य समजून घेऊन चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी.असे मिलिंदकुमार वाघ यांनी प्रशिक्षण दरम्यान कर्मचाऱ्यांना सांगितले.
आज अमळनेर येथील शिवाजी नाट्य सभागृहात
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रशिक्षणात तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी प्रोसिडिंग ऑफिसर व निवडणूक
अधिकारी यांना कामे समजून
सांगितली.
कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्यांचे निरसन त्यांनी केले. आणिबाणीच्या वेळेस झोनल अधिकाऱ्यांची मदत घ्यावी.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची महमूल
विभागाने पूर्णपणे तयारी केली असून
कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण पुढील
आठवड्यात होणार आहे.अशी माहिती मिलिंदकुमार वाघ यांनी दिली आहे.
यावेळी शिवाजी नाट्य सभागृहात अमळनेट
तालुक्यातील प्रशिक्षणार्थी मोठ्या प्रमाणावट
उपस्थित होते. यावेळी प्रात्यक्षिक निवडणुक
तलाठी पिंटू चव्हाण, वाल्मिक पाटील यांनी
करून दाखवले.






