Amalner

डॉ.शरद बाविस्कर यांनी रेखाटल्या चित्रांचे दोन दिवसीय भव्य प्रदर्शन “प्रतिबिंब” दि.२१ व २२ डिसेंबर रोजी रोटरी हॉल येथे आयोजन

डॉ.शरद बाविस्कर यांनी रेखाटल्या चित्रांचे दोन दिवसीय भव्य प्रदर्शन “प्रतिबिंब” दि.२१ व २२ डिसेंबर रोजी रोटरी हॉल येथे आयोजन

अमळनेर( ) येथिल सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.शरद बाविस्कर यांनी रेखाटल्या चित्रांचे दोन दिवसीय भव्य प्रदर्शन “प्रतिबिंब” दि.२१ व २२ डिसेंबर रोजी रोटरी हॉल येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
आरोग्य क्षेत्रात आपल्या व्यापक कार्यभाग सांभाळून कला जोपासना करणारे अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.शरद बाविस्कर यांच्या कलात्मक हातातून साकारलेल्या आकर्षक व संवेदनशील अश्या चित्रांचे भव्य प्रदर्शन “प्रतिबिंब” चे आयोजन करण्यात आलेले आहे.रोटरी हॉल,पी. बी.ए इंग्लिश मिडीयम स्कुल अमळनेर शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सौ.कस्तुराबाई व श्री शंकरराव बाविस्कर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होईल.तर रविवारी दिनांक २२ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत सदर प्रदर्शन प्रेक्षकांना साठी मोफत खुले असणार आहे.
प्रदर्शनातील चित्र सर्व वयोगटातील व्यक्तींना भावतील व प्रेरणा देतील पुन्हा पुन्हा पाहवेसे वाटतील अश्या अप्रतिम चित्रांचे प्रदर्शन अमळनेरकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे या मोफत व खुल्या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी,कलाप्रेमींनी मोठ्यासंख्येने घ्यावा असे आवाहन डॉ.शरद बाविस्कर व मित्र परिवाराने केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button