?️अमळनेर कट्टा.. प्रशासन कोमात..!घर जावई जोमात..!कहां खुला कहां बंद किया..!अमळनेरात लॉक डावूनचा फज्जा..!
अमळनेर येथे उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर केल्या प्रमाणे दि 27 मार्च ते 29 मार्च लॉक डाऊन असून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार दि 30 मार्च पर्यंत जिल्हा बंद आहे.यामुळे अमळनेर एकूण 4 दिवस बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील सर्व दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता बंद आहेत.पण याला अपवाद आहे काही ठराविक लोकं..मागच्या शनिवारी रविवारी देखील लॉक डाऊन काळात देखील काही दुकाने बिनधास्तपणे सुरू होते.आताही 4 दिवसांच्या लॉक डाऊन मध्ये प्रशासनाचे जावई बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करत आहेत. अनेक ठिकाणी आज लॉक डावूनच्या दुसऱ्या दिवशी बरीच दुकाने सुरू असलेली आढळून आली.बिचारे जे नियमांचे पालन करत आहेत ते घरी गुपचूप बसले आहेत आणि जे प्रशासनाचे घर जावई आहेत ते मागच्या प्रमाणेच नियमांचे उल्लंघन करत दुकाने व इतर व्यवसाय सुरू ठेवून आहेत.आता हा सर्व विषय प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना दिसत नाही की त्यांनी गांधारी प्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधली आहे..? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज गावात मोठया प्रमाणात रेस्टॉरंट,नाश्ता केंद्र व इतर दुकाने सुरू असलेली आढळून आली आहेत.गांधलीपुरा भागात पोलीस चौकी समोरच पिंजरा गाडी आणि त्या समोरच हॉटेल सुरू असल्याची माहिती एका नागरिकाने दिली आहे.प्रशासन च जर उदासीन आहे मग जनतेला वेठीस धरू नका अशी नागरिकांमध्ये कुजबुज सुरू असून ह्या लॉक डाऊन ला काय अर्थ आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आता नियम हा सर्वांना सारखा असणे आवश्यक आहे. पण प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांना हे मार्केट सुरू आहे हे दिसत असूनही कार्यवाही का होत नाही. सामान्य लोकांना त्रास देणारे हे प्रशासन नियम सर्वांना सारखे का लावू शकत नाही..? असा प्रश्न निर्माण झाला आहे.






