Amalner

?️ अमळनेर कट्टा…आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नामुळे पांझरेला अक्कलपाडा धरणातून सुटले पाणी

?️ अमळनेर कट्टा…आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नामुळे पांझरेला अक्कलपाडा धरणातून सुटले पाणी
प्रतिनिधी अमळनेर- आमदार अनिल पाटील यांनी पांझरा नदीत आवर्तन सोडावे या मागणीसाठी धुळे जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते पाठपुरावा केला होता त्यामुळे मंगळवारी धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून प्रति सेकंद 300 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले त्याबद्दल अशी माहिती प्रफुल्ल देशमुख यांनी दिली.
यासाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचीही गेल्या आठवड्यात भेट घेऊन याबाबत माहिती कानावर टाकली होती त्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्यात यावी याबाबत सूचना केल्या होत्या.
दरम्यान पाणीपट्टी थकबाकी म्हणून पाटबंधारे विभाग धुळे पाणी सोडत नव्हते हे सुद्धा कानी टाकले होते. त्यावर कार्यवाही होऊन पाणी सुटले आहे याबाबत आमदार पाटील यांना माहिती देण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button