?️अमळनेर कट्टा..पांझेरेत वाळू माफियांवर महसूलचा दणका..!अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅकटर जप्त..!
अमळनेर येथीलपांझरा नदीत सातत्याने अवैध वाळू उपसा सुरू असतो.या बाबतीत गावकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. या अनुषंगाने दिनांक 20/06/2021 मौजे एकलहरे येथे पांझरा नदीपात्रात अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर शहर तलाठी अमळनेर जी आर महाजन तलाठी, मं अ वी .पी पाटील वावडे , आशिष पारधे तलाठी सारबेटे प्रकाश महाजन तलाठी नंदगाव, सचिन बमनाथ तलाठी बाह्मणे तिलेश पवार तलाठी मांडळ व सुभाष सपकाळे कोतवाल अमळगाव यांनी पकडले तसेच सदर ट्रक्टर मुद्दे मालासह तहसील कार्यालयात जमा केले आहे.सदर कार्यवाही मा तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर महसूल विभागाने केली आहे.






