Aurangabad

क्रांतीचौक पोलिसांनी सात दुचाकीसह एका आरोपीस केली अटक

क्रांतीचौक पोलिसांनी सात दुचाकीसह एका आरोपीस केली अटक

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : शहरात वाहनचोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून क्रांतीचौक पोलिसांनी एका वाहनचोरास अटक करून त्याच्याकडून ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. मुख्य सूत्रधार रईस बोक्या दुसऱ्या गुन्ह्यात तुरुंगात असून त्याच्या सांगण्यावरून शेख अतिफ शेख लतीफ वय २० रा. आलमगीर कॉलनी, साजापूर) हा वाहन चोरी करत होता.

पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संतोष राऊत आणि पथक एस टी वर्कशॉप जवळून जात असतांना. त्यांना अतीफ संशयित हालचाली करतांना दिसला. त्यांनी सुरुवातीला त्याच्याकडे विचारपूस केली, तो उडवा उडवीची उत्तर देत असल्याचे समजताच त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच दुचाकीची चोरी रईस बोक्याच्या सांगण्यावरून केल्याचे अतीफने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी अतीफकडून १ पल्सर, २ शाईन, ४ एच एफ डिलक्स, ४ दुचाकी जप्त केल्या. त्यामुळे क्रांती चौक ४, छावणी २ आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यातून १ अशा सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button