Amalner

? नागरिक खरेदीत व्यस्त,प्रशासन सुस्त आणि कोरोना मजेत,आरामात घुसत…

अमळनेर येथे अत्यंत क्रिटिकल स्थिती…तरीही बाजारात पूर्ण पणे गर्दी…नागरिक बाजारात व्यस्त,प्रशासन सुस्त आणि कोरोना मजेत आरामात घुसत…

अमळनेर येथे आतापर्यंत चार कोरोना सकारात्मक बाधित व्यक्ती पैकी 3 मृत आणि एक जिवंत अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जनता अजिबात गंभीर नसून रस्त्यावर, घरा बाहेर गर्दी होतेच आहे.

काल सील केलेला साळी वाड्यात देखील आजाराचे गांभीर्य नसून लोक चौका चौकात गर्दी करून उभे होते.चेहऱ्यावर मास्क नाही,गावात अनेक लोक फिरत असल्याचे चित्र दिसून आले.जणू काही चौपाटीवर फिरत आहोत अश्या अविर्भावात नागरिक रात्रीच्या जेवणानंतर वॉकिंग करत असल्याचे दिसून आले. अनेक दुकाने चक्की सुरू असलेल्या आढळून आल्या.तसेच अनेक दूध विक्रते या भागात ये जा करतांना आढळून आले.

कोरोना रुग्ण आढळून आलेला भाग कंटेंटमेंट एरिया म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा भाग दाट लोकवस्ती चा असून बाहेरून जरी चारही बाजूंनी हा भाग सील केला असला तरी आतल्या आत हा भाग खूप मोठा आहे. आणि येथील जनता गरीब ते मध्यम वर्गीय आहेत.

आज सकाळी तर कुंटे रोडवर मोठ्या प्रमाणात गर्दी बाजारात उसळली होती.विशेष म्हणजे हा भाग सील केलेल्या भागा पासून जास्त दूर नाही.लोकं जसे काही खायला काही मिळणारच नाही या आवेशात बाजारात तुटून पडतात.या 4 कोरोना बाधित लोकांचा अनेक लोकांशी संबंध आला असून नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.नागरिक खरेदीत व्यस्त…प्रशासन सुस्त आणि कोरोना मजेत घुसतं अशी परिस्थिती साधारण पणे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अशिक्षित लोकां पेक्षा सुशिक्षित, समजदार लोकच जास्त गर्दी करत आहेत. नियमांचे उल्लंघन करत आहेत.काळजी घ्या… शिस्त पाळा.. कोरोना टाळा…ठोस प्रहार च्या परिवारातर्फे आपणांस विनम्र आवाहन करत आहोत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button