?️ अमळनेर कट्टा अमळनेर शहरातील नविन बांधकामाच्या ठिकाणी मजुरांची आरोग्य तपासणी..
अमळनेर ; सामाजिक बांधिलकी म्हणून शहरात आणि शहरालगत राम नगर,आर.के.पटेल नगर तसेच ड्रीम सिटी परिसरात सुरू असलेल्या नवीन बांधकामावर काम करणाऱ्या बांधकाम कामगार आणि स्थलांतरित मजुरांची ग्रामीण रूग्णालय अमळनेर आणि सुभराऊ फाऊंडेशन अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील तसेच ग्रामीण रूग्णालयाचे कौंशिलर अमोल सूर्यवंशी मुरलीधर बिरारी (ओ आर.डब्लू) हे उपस्थित होते.






