आम्ही एकत्र राहून विरोधी पक्षात बसू, महाराष्ट्राचे प्रश्न मांडू पण शिवसेनेसोबत जाणार नाही – शरद पवार
कोल्हापुर प्रतिनिधि अनिल पाटील
आम्ही एकत्र राहून विरोधी पक्षात बसू, पण शिवसेनेसोबत जाणार नाही. त्यांच्यासोबत जाण्याचा काही संबंध नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी कायम एकत्र राहील. आम्ही एकत्र राहून महाराष्ट्राचे प्रश्न मांडू, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत जाण्याबाबतच मोठं वक्तव्य केलं आहे.
ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याकडून जनतेचे प्रश्न सोडवू, असंही शरद पवार यांनी मुलाखतीत सांगितलं आहे. ते आज वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याबाबत त्यांची काय भूमिका आहे? यावर भाष्य केलं आहे.
निवडणुकीच्या निकालामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी असल्याचं दिसतय. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. शिवसेना जर राष्ट्रवादीसोबत आली तर त्यांना मुख्यमंत्रिपद मिळेल, असं बोललं जात आहे
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मोठं यश मिळवलं आहे. यामध्ये एकट्या राष्ट्रवादीने काँग्रेसपेक्षा जास्त 54 जागांवर विजय मिळवला आहे.






