Ahamdanagar

शासनाच्या स्मार्ट ग्रामसमिती कडून कासार पिंपळगावची मुल्यांकन पाहणी

शासनाच्या स्मार्ट ग्रामसमिती कडून कासार पिंपळगावची मुल्यांकन पाहणी

सुनील नजन

राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम योजना २०१९-२० या वर्षातील पुरस्कारासाठी पाहणी समितीने कासार पिंपळगाव ता. पाथर्डी येथील ग्रामपंचायतीस भेट देऊन कामकाजाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी.बी. कोकणी यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त गट विकास अधिकारी दयानंद पवार, विस्तार अधिकारी साळवे आदींच्या समितीने भेट देऊन कामांची पाहणी केली.

शासनाच्या स्मार्ट ग्रामसमिती कडून कासार पिंपळगावची मुल्यांकन पाहणीग्रामपंचायतच्या हद्दीतील अंतर्गत रस्ते,लोकसहभागातून हागणदारीमुक्त अभियान, पिण्याचे पाण्याचे व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायतमार्फत दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षणविषयक सुविधा, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आदी बाबींची समितीकडून पाहणी करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन दैनंदिन कामकाज, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली तसेच ग्रामपंचायत संगणकीकृत कामकाजाची पाहणी केली.

शासनाच्या स्मार्ट ग्रामसमिती कडून कासार पिंपळगावची मुल्यांकन पाहणीसरपंच मोनाली राजळे व ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांनी समितीला सर्व योजनांची माहिती दिली.यावेळी ग्रा.पं. सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच तलाठी शिंपले मँडम,लाईनमन राजळे,शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, अशा सेविका यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शालेय पोशन आहाराबाबत मात्र तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button