श्रीकृष्ण दूधसंस्थेतर्फे उत्पादकांना बोनस वाटप
तुकाराम पाटील -कोल्हापूर
श्रीकृष्ण दूध सहकारी व्यावसायिक संस्था मर्यादित नंद्याळ तालुका कागल यांच्यावतीने चालू वर्षी 2018-19 मध्ये दूध पुरवठा केलेल्या उत्पादकांना दिपावली बोनस वाटप संस्थेच्या हॉलमध्ये एकत्रित करण्यात आला त्यामध्ये म्हैस दुधास- 13.10% आणि गाय दुधास- 6% अशा उच्चांकी पद्धतीने दुध उत्पादकांना एकूण वाटप रुपये रक्कम- 475000/ करणेत आली. तसेच दूध उत्पादकांना तीन किलो प्रति साखर वाटप केले.
उच्चांकी बोनस दूध उत्पादक आणि रक्कम रुपये-
*१.आनंदा विश्वनाथ अस्वले-*
*५८१०५/-*
*२.शिवाजी महादेवआडेकर-*
*५४९५२/-*
*३. शंकर तुकाराम अस्वले-*
*२३१५७/-*
यावेळी संस्थेचे चेअरमन मधुकर करडे म्हणाले की,
सर्वसामान्य दूध उत्पादकांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी आमची संस्था कटिबद्ध आहे. यापूर्वीसुद्धा संस्थेने महिलांसाठी महाराष्ट्र दर्शन सहल तसेच घरगुती उपयोगी साहित्य भेटवस्तू स्वरूपात दिलेल्या आहेत अशा अनेक उपक्रमामुळे आणि स्वच्छ कारभारामुळे संस्थेला ए एस प्रतिष्ठान कोल्हापूर आणि गोकुळ चा *आदर्श* पुरस्कार मिळालेला आहे. यावेळी उपस्थित प्रदिप करडे, आण्णासाहेब कोराणे, आनंदा अस्वले, किरण शिंदे, राजाराम आंबीलढोके, शिवाजी आडेकर, शंकर अस्वले,निलेश फगरे, बाळकृष्ण कुणकेकर, मारुती ढेंगे पांडुरंग कांबळे बाबुराव करडे सर्व संचालक व दूध उत्पादक उपस्थित होते.






