Surgana

माकपा व किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि काँम्रेड. मा.आमदार. जे.पी.गावीत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी,कष्टकरी,भुमीहीन मजदुर, कामगार, व्यापारी,बेरोजगार तरुण यांचा विराट मोर्चा

माकपा व किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि काँम्रेड. मा.आमदार. जे.पी.गावीत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी,कष्टकरी,भुमीहीन मजदुर, कामगार, व्यापारी,बेरोजगार तरुण यांचा विराट मोर्चा

विजय कानडे

दि.१५ सप्टेंबर २०२० रोजी पेठ तहसील कार्यालयावर माकपा व किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि काँम्रेड. मा.आमदार. जे.पी.गावीत सो यांच्या नेतृत्वाखाली – शेतकरी,कष्टकरी,भुमीहीन मजदुर, कामगार, व्यापारी,बेरोजगार तरुण यांचा विराट मोर्चा काढण्यात आला.
मोर्च्याच्या मागण्या

१. पेठ तालुक्याची आणेवारी ५० पैस्याच्या आत लाऊन संपूर्ण तालुका दुष्काळी जाहिर करण्यात यावा.
२.स्थानिक पातळीवर मागेल त्याला काम मिळाले पाहिजे यासाठी रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुण गावाच्या शिवारातच काम उपलब्ध करून दिली पाहिजे आणि कामाचे दिवस १०० ऐवजी २०० दिवस करा तसेच २३८ ₹ रोज ऐवजी ५००₹ रोज करा. म्हणजे आपला आदिवासी समाज देशी भागावर रोजगारासाठी जाणार नाही.त्याला गावातच काम मिळेल म्हणून तो स्थलांतरित होणार नाही.
३.आँनलाईन शिक्षण पध्दत अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन स्तरावर नियोजन करण्यात यावे.
४.वनजमीन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन आदिवासी दावेदारांना तात्काळ स्वतंत्र सातबार देण्यात यावा.
५.व्रुद्धापकाळ पेन्सन योजनेचे थकित हप्ते तातडीने देण्यात यावे व नवीन प्रकरणे विनाविलंब मंजूर करण्यात यावीत.
६.पेठ तालुक्यातील १६ हजार लाभार्थांना प्रधानमंत्री आवाज योजना “ड” मध्ये नावे नोंदविण्यात आली आहेत. ती नावे तात्काळ आँनलाईन करण्यात यावीत. तसेच काही ग्रामपंचायत मध्ये राजकीय सुड भावनेने वंचित ठेवलेले लाभार्थी आहेत.त्यांना पण “ड” यादी मध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे.
७.प्रत्येक नवीन कुटुंबाला नवीन रेशन कार्ड तयार करुन द्या.
८.खावटी कर्जा साठी कोणतीही अट न लावता प्रत्येक आदिवासी कुटुंबाला खावटी दिली पाहिजे.
९.कोरोना काळातील (२२मार्च ते ३० सप्टेंबर) वाढीव लाईट बिल सरसकट माफ करण्यात यावीत.तसेच गावातील खराब झालेले विजेचे पोल बदलून देण्यात यावे.
१०. तालुक्यातील खराब झालेले रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करा.
११.पेठ तालुक्यातील वाढता ‘कोरोणा’ रोखण्यासाठी आरोग्य सेवेने आणि प्रशासनाने कठोर अंमलबजावणी केली पाहिजे.
या सह अनेक स्थानिक, राज्यस्तरीय, आणि राष्ट्रीय विषयांवर चर्चा करून मा.तहसीलदार, BDO व सबंधित सर्वच खात्याच्या अधिकारी वर्गाची चांगलीच खरडपट्टी काढून आढावा घेण्यात आला.

मोर्चाचे नेतृत्व
मा.आमदार. काँम्रेड. जे.पी.गावीत
काँम्रेड. अँड. दत्तु पाडवी
काँम्रेड. इंद्रजित जीवा गावीत
काँम्रेड. डॉ. देवराम गायकवाड
काँम्रेड. महेश टोपले मा.उपसभापती
काँम्रेड. लिंबेकर
काँम्रेड.शिवराम गावीत
काँम्रेड.प्रभाकर गावीत .काँम्रेड. उत्तम महाले, समीर राजे ,जावेद शेख,रवी जाधव, रजा राजे,ब्रामणे,तुकाराम मोंडे,कैलास राऊत, दिलीप गावीत, भुसारे, शुभाष चौधरी, मोहन पाडवी सह अनेकांनी चांगले मार्गदर्शन केले.
मोर्चा साठी तालुक्यातुन ७ ते ८ हजाराचा जनसमुदाय उपस्थित झाला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button