सुंदरपट्टी येथे आदिवासी कुटुंबातील लाभार्थ्यांना मा ना गुलाबराव पाटील यांनी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या
अमळनेर
COVID 19, (कोरोना) महामारी वर मात करण्यासाठी आज दि. 23/05/2020 रोजी लॉकडाऊन चा चौथा टप्यात ग्राम पंचायत आदर्शगाव सुंदरपट्टी, ता अमळनेर.
यांनी गावातील आदिवासी कुटूंबातील व गरजू लाभार्थ्यांची यादी अमळनेर तालुक्यातील शिवसेना पक्षाचे पद अधिकारी यांच्याकडे दिल्याने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भाऊसो श्री गुलाबरावजी पाटील. यांनी गरिबांना एक महिनाभर पुरेसे एवढे किराणा किट उपलब्ध करून दिल्या बद्दल, ग्राम पंचायत सुंदरपट्टी ता. अमळनेर यांनी आदिवासी 15 कुटूंबाना किट, देवून त्यांना पाच डेटॉल साबण, मास, सनिटायझर देवुन सोशल डिशस्टणस अंतर राखून प्रत्येकाची फोर हेड थरमोमिटर, मशीनने आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी प्रत्येकाने आपली आरोग्याची काळजी घ्या. असे आव्हान लोकनियुक्त सरपंच श्री. सुरेश अर्जुन पाटील, आदर्श गाव सुंदरपट्टी यांनी केले.
शिवसेना कडून आलेले किराणा मालाचे किट या साठी केलेले प्रयत्न शिवसेना चे तालुका अध्यक्ष विजू पाटील (मास्तर), शहर अध्यक्ष बापूसो संजय कौतिक पाटील, डॉ. राजेंद्र पिंगळे, नगरसेवक प्रताप आबा शिंपी यांनी गरजू लाभार्थ्यांना किराणा मालाची किट उपलब्ध करून दिल्या बद्दल ग्रामस्थांन तर्फ सुंदरपट्टी ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी आभार मानले.






