Amalner

?️अमळनेर कट्टा…अमळनेर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून “येथे” समोरच बसतात वाळू माफिया..!आणि होतात सर्व व्यवहार..!काय आहे साटं लोटं..!

?️अमळनेर कट्टा…अमळनेर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून “येथे” समोरच बसतात वाळू माफिया..!आणि होतात सर्व व्यवहार..!काय आहे साटं लोटं..!

अमळनेर येथे बिनधास्त पणे वाळू उपसा आणि वाहतूक जळोद,फापोरे,शहापूर, कलंबू,मांडळ इ ठिकाणाहून दिवस रात्र सुरू असते.प्रशासनाचा वरद हस्त आणि सोईस्कर पणे केले जाणारे दुर्लक्ष यामुळे अगदी आरामात वाळू माफियांची चांदी आहे..!यावर वरकडी म्हणजे अमळनेर उपविभागीय अधिकारी आणि तहसील यांच्या कार्यालयाच्या अगदी जवळच वाळू माफियांचा अड्डा आहे.येथूनच बरेच व्यवहार केले जातात. या चहाच्या टपरीवर सर्व मोठे वाळू माफिया सकाळ पासूनच ठिय्या मारून बसलेले असतात.येथूनच वाळूच्या ऑर्डर्स घेतल्या जातात. भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला जातो. हे ठिकाण आहे पोळ यांची चहाची टपरी..याच्या अगदी समोरच माजी आमदार यांचा बंगला आहे..!आणि वाळू माफियांवर ना ही प्रशासन ना ही राजकीय दबाव यामुळे..बिनधास्तपणे बोरी नदी,पांझरा नदीचे वस्त्रहरण सुरु आहे..शासकीय यंत्रणा छोट्या छोट्या टेंपो,ट्रॅकटर पकडून त्यांच्या वर कार्यवाही करते आणि मोठ्या वाळू माफियांना मात्र पाठीशी घालते अशी चर्चा शहरात सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा तक्रारी करूनही पुरावे देऊनही कार्यवाही होत नसल्याची देखील चर्चा तालुक्यात सुरू आहे.कोणाच्या आशीर्वादाने अमळनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा सातत्याने होत आहे? यामागे कोणती कारण आहेत? यंत्रणा काम करते मग वाळू उपसा थांबत का नाही? घरका भेदी लंका ढाये..!या उक्ती प्रमाणे कार्यवाही करायला निघालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांची माहिती तात्काळ वाळू माफियांपर्यंत कशी पोहचते? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button