शेततळ्यात बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील म्हस्की येथील पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. योगेश जगताप व भाऊराव जाधव असे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणांचे नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास योगेश व भाऊराव दोघे तरुण जवळच्या सुनील घोलप यांच्या शेततळ्यावर पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण पाण्यात बुडाले. याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले.
पोलिसांनी तरुणाना बाहेर काढून वैजापूर घाटी रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. यावेळी डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. याप्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.






