?️अमळनेर कट्टा.. झारे बिल्डिंग मध्ये झापा…कल्याण मटका जुगार खेळणारा ताब्यात..गये थे चीन पहूंच गये जपान..
अमळनेर येथील झारे बिल्डिंग येथे पोलिसांनी आज छापा टाकला.पोलिसांना येथे कुंटण खाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार ह्या बिल्डिंग मध्ये छापा टाकला असता.तेथे महिला व पुरुष हाती आले नाहीत त्यामुळे निल चा शेरा मारण्यात आला आहे.पण याच दरम्यान तेथे सुरू असलेला कल्याण मटका जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले.यात कॅश रु 2960 ताब्यात घेण्यात आले असून विनोद संतोष महाले रा शिरसाळे ह्या आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.कल्याण मटका नावाचा जुगारासाठी पैसे स्वीकारताना आढळला.सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी पो ना कैलास शिंदे हे असून फिर्यादी पो ना दिपक माळी हे आहेत.जुगार कायदा कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर छापा टाकण्यात आला. एपी आय राकेश सिंग परदेशी, विवेक पाडवी पीएसआय,दीपक माळी पो ना,प्रमोद पाटील,पो का,मधुकर पाटील पथकात समाविष्ट होते.






